Wednesday, December 4, 2024
Homeजळगावट्रॅक्टर उलटून रिंगणगावच्या युवकाचा मृत्यू

ट्रॅक्टर उलटून रिंगणगावच्या युवकाचा मृत्यू

एरंडोल – Erandol – प्रतिनिधी :

भरधाव वेगाने जाणाऱे ट्रॅक्टर ने रस्त्याने पायी चालत असलेल्या सचिन श्रीराम सुरसे (वय 25) या युवकाला ट्रॅक्टरने धकड दिली व ट्रॅक्टर उलटल्यानेे त्यात सुरसे हा ट्रॅक्टर खाली येऊन दाबला गेला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

ही घटना बुधवारी रात्री 12.30 वाजता विखरण-रिंगणगाव रस्त्यावर घडली. याबाबत ट्रॅक्टर चालक शरद आनंद शिंदे यांच्याविरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की सचिन श्रीराम सुरसे (रा.रिंंगणगाव) याने गावातील अशोक नामदेव मते यांचे रिंगणगाव शिवारातील शेत जुपने केले आहे.

सचिन हा दि. 2 डिसेंबरच्या मध्यरात्री 12.30 वाजता रिंगणगाव ते विखरण रस्त्यावर पायी जात असताना रिंगणगाव नजीक एम एच 19 सीवाय 1308 क्रमांकाच्या भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रॅक्टरने सचिनला धडक दिली व ट्रॅक्टर कालवा जवळील खोल खड्ड्यात उलटले त्यात सचिन हा ट्रॅक्टर खाली दाबला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

यावेळी गावातील जितेंद्र पुंडलिक बोबडे, धनराज पडोळ, गोपाल ढोके, पोलीस पाटील व इतर लोकांनी मिळून त्याला बाहेर काढले व पिकअप गाडीतून एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले त्या ठिकाणी सचिन मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.

याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला मृताचा भाऊ समाधान श्रीराम सुरसे याने फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, अकिल मुजावर, संदीप सातपुते हे पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या