वडिलांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी एरंडोलला आलेली महिला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमध्ये माहेरी अडकल्यानेे तिच्या पतीकडे शेगावला घरीच असलेला मुलगा १० दिवसात आईच्या आठवणीने व्याकूळ झाला.
मुलगा आई…आई… करीत असल्याचे कळताच आईने पोटच्या गोळ्यासाठी एरंडोलहून थेट शेगावची चक्क पायी वाट धरली. ही महिला तांबापुरा परिसरात जात असताना तिला भोवळ आली. या महिलेस पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सध्या वाहनसेवा बंद आहे. त्यामुळे माहेरी आलेली हिरा रमेश वाघोले ही महिला दोन वर्षाच्या चिमुकल्याच्या प्रेमापोटी पायीच शेगावकडे सासरी निघाली. हि महिला सोमवारी जळगावातील तांबापुरा परिसरातून जात असताना ती बेशुद्ध पडली.
याबाबत कळताच एमआयडीसी पोलिसांनी तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे .
हि महिला वडिलांच्या भेटीनंतर दोन दिवसांनी पुन्हा त्या सासरी शेगाव येथे परतणार होती. मात्र, दरम्यानच्या काळात लॉकडाऊन, संचारबंदीमुळे वाहतूक ठप्प झाल्याने समस्या निर्माण झाली. सासरीकडे पतीकडे सोडून आलेला दोन वर्षाच्या मुलगा रोज आई…आई…करीत रडत होतो.
याबाबत पतीने फोन करुन महिलेला सांगितले. वाहने बंद असल्याने तान्हुल्याच्या प्रेमापोटी आईने शेगावी पायी जाण्याचा निर्णय घेतला होता.
या प्रकाराची माहिती पोलिसांनी महिलेच्या पतीला फोनवरुन कळवले आहे. मात्र, वाहने बंद असल्याने शेगावहून जळगाव यायचे तर कसे? ऊाशहा प्रश्न त्यांना देखील पडला आहे. तर दुसरीकडे जळगावात दाखल असल्याने मुलाची भेट आईसोबत घडवायची कशी? असा प्रश्न पोलिसांना आहे.