Saturday, July 27, 2024
Homeनगरडॉक्टर, पोलिसांवर गुन्ह्यासाठी एरंडोलकरांचे आंदोलन

डॉक्टर, पोलिसांवर गुन्ह्यासाठी एरंडोलकरांचे आंदोलन

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

एरंडोल येथील युवकाच्या खून प्रकरणात खोटा शवविच्छेदन अहवाल देणारा डॉक्टर व गुन्हा लपवणारे पोलीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्याने एरंडोली ग्रामस्थांनी आंदोलन केले. दरम्यान खुनातील दोघांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली असून बाकीचे पाच आरोपी फरार झाले आहेत.

- Advertisement -

श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली येथील तरुणांचा मढेवडगाव येथे कामावर असताना संशयास्पद मृत्यू झाला होता. यात उशीराने हत्येचा गुन्हा दाखल झाला असून सात पैकी दोन आरोपी श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. मात्र या प्रकरणात मयत तरुणाची दोनदा उत्तरीय तपासणी होताना पुण्यातील अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल झाला. श्रीगोंदा येथिल वैद्यकीय अधिकारी आणि गुन्हा दाखल करण्यास विलंब करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी यासाठी नगरला जाऊन एरंडोली ग्रामस्थानी निवेदन दिले आहे.

एरंडोली येथील ग्रामस्थ तसेच नातेवाईक यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक यांना पत्र देऊन बोगस पोस्टमार्टेम रिपोर्ट देणार्‍या डॉक्टरला निलंबीत करावे तसेच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना गुन्हेगार व त्यांना मदत करणारांवर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून निवेदन दिले. खुनाचा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न करणे, गुन्हा दाखल करून न घेणे, खोटा पोस्टमार्टेम रिपोर्ट देणे, आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करणारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याच्या कारवाईची मागणी केली आहे.

पोलिसांनी दिलीप मांडे आणि प्रवीण मांडे यांना अटक करून न्यायालयात हजर केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या