Saturday, July 27, 2024
Homeनगरएरंडोली येथील युवकाची आत्महत्या नव्हे हत्या

एरंडोली येथील युवकाची आत्महत्या नव्हे हत्या

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील एरंडोली येथील समाधान अंकुश मोरे (वय 19) या युवकाचा झाडाला लटकलेला मृतदेह आढळला होता. परंतु ही आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आली असल्याचे शवविच्छेदन अहवालाद्वारे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मढे वडगाव येथील सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दिलीप गणपत मांडे, पाडुंरंग उंडे, प्रविण दिलीप मांडे, अभि दिलीप मांडे, बाळासाहेब मांडे, अक्षय त्रंबक मांडे, आकाश बाळासाहेब मांडे (सर्व रा. मढेवडगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी मयत समाधान मोरे यांची आई रूपाली मोरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार समाधान हा मढेवडगाव येथे दिलीप मांडे यांच्या घरी ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून चार वर्षांपासून कामाला होता.

तो ट्रक्टर चालक असताना त्याला घरातील कामे सांगितली जात असल्याने त्याचे व मांडे कुटुंबियांचे वाद झाल्याने तो काही कामानिमित्त 15 दिवसांपूर्वी न सांगता त्याच्या एरंडोली गावी निघून आला होता. 14 जुलै रोजी संध्याकाळी दिलीप मांडे व त्यांच्या अन्य साथीदारांनी पुन्हा कामासाठी मढेवडगांव येथे घेऊन आले. यानंतर त्याचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मांडे यांनीच काम न केल्यामुळे मारहाण करून त्यांचा खून करून त्यास फाशी देऊन झाडाला अडकविले आहे. असा आरोप रूपाली मोरे यांनी केला आहे.

शवविच्छेदनावर संशय

मयताच्या आईने माझ्या मुलाचे परत शवविच्छेदन करावे याबाबत तक्रार अर्ज दिला. तेव्हा मुलाचे शवविच्छेदन हे पुन्हा पुणे येथील ससुन हॉस्पिटल येथे करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी समाधानला छाती व डोक्याला मार लागल्यामुळे तो मयत झाला असल्याचे स्पष्ट केले. परंतु समाधान याचे शवविच्छेदन प्रथम श्रीगोंदा येथील ग्रामिण रूग्णालयात झाले होते. यावेळी येथील डॉक्टरांनी मात्र वेगळाच अहवाल दिला. याबाबत मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचीही शंका व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या