Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशपंतप्रधान कार्यालयासह मंत्रालये चिनी हेरांच्या रडारवर

पंतप्रधान कार्यालयासह मंत्रालये चिनी हेरांच्या रडारवर

नवी दिल्ली –

पंतप्रधान कार्यालयासह महत्त्वाच्या मंत्रालयांतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून

- Advertisement -

संवेदनशील माहिती काढून घेण्याचे लक्ष्य चिनी महिला हेर ‘क्विन शी’ला देण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीतून समोर आली आहे.

या हेरगिरी प्रकरणात पोलिसांनी सप्टेंबरमध्ये चिनी महिलेसह भारतीय पत्रकार राजीव शर्मा आणि नेपाळी व्यक्तीस अटक केली आहे. क्विन शी आणि तिचे साथीदार चीनच्या दोन व्यक्तींसाठी हेरगिरी करायचे. प्रशासकीय अधिकार्‍यांची इत्थंभूत माहिती देण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. यासाठी महाबोधी मंदिरातील एका भिक्खूने 2019 सालातील अखेरीस क्विन शीची भेट कोलकात्यातील एका महिलेसोबत घालून दिली होती. ही महिला इंग्रजीतील दस्तावेज देईल. त्याचा मँडेरियन अनुवाद करून करून द्यायचा, असे क्विन शी हिला सांगण्यात आले होते.

तिने दिलेल्या दस्तावेजांचा मँडेरियन अनुवाद केल्यानंतर हे दस्तावेज चिनी सुरक्षा यंत्रणेतील एका वरिष्ठ अधिकार्‍याला सोपवण्याची जबाबदारी देखील तिच्यावर होती. क्विनच्या संपर्कात आलेल्या कोलकात्यातील व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती तपास अधिकार्‍याने दिली.

पत्रकार राजीव शर्मा क्विन शीच्या सातत्याने संपर्कात होता. दिल्लीतील न्यायालयाने मंगळवारी त्याचा जामीन फेटाळला आणि 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. शासकीय गोपनीय कायद्याप्रमाणे तपास यंत्रणेने या प्रकरणाशी संबंधित पुरावे सादर केलेले नाहीत, हे न्यायालयाने गाह्य धरले. मात्र, या कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्याच्या न्यायालयीन कोठडीचा अवधी वाढवला. क्विन शीच्या वसंतकुंज येथील निवासस्थानातून जप्त करण्यात आलेले सहा लॅपटॉप आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे न्यायवैद्यक परीक्षणासाठी पाठवण्यात आले आहेत. तिचे संपर्क शोधण्यासाठी या उपकरणांचे न्यायवैद्यक परीक्षण केले जाणार आहे.

हेरगिरीसाठी कोलकाता विमानतळावर काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे लावल्याची आणि दलाई लामांच्या डॉक्टरांसह त्यांना भेटणार्‍यांची माहिती गोळा केली जात होती, अशी कबुली आरोपींनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या