Sunday, March 30, 2025
Homeधुळेफिरत्या पशुचिकित्सा पथकांची स्थापना

फिरत्या पशुचिकित्सा पथकांची स्थापना

दोंडाईचा । प्रतिनिधी dhule

शेतकर्‍यांच्या पशुधन आजारी पडल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात घेवून जावे लागत असे. परंतु आता फिरत्या पशु वैद्यकीय पथकांची स्थापना करण्यात आली असून यामुळे थेट शेतकर्‍यांच्या पशुधना पर्यंत वैद्यकीय सेवा पोहचणार आहे. या मागणीसाठी माजी मंत्री आ.जयकुमार रावल यांनी सततचा पाठपुरावा केला होता. त्यास यश आले आहे.

मागील काही महिन्यांपासून या फिरत्या पथकाच्या मागणीसाठी प्रयत्नरत होतो. आज ही मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार, हे शासन जनतेच्या हिताचे असून या फिरत्या पथकामुळे खरोखर शासन आपल्या दारी येणार आहे.

- Advertisement -

-आ.जयकुमार रावल, माजी मंत्री/आ.शिंदखेडा विधानसभा

राज्यातील पशुधनास कृत्रिम रेतन, औषधोपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया, वंध्यत्व, गर्भधारणा व आजारपण आदी प्रकारच्या पशु आरोग्य सेवा नजीकच्या पशु वैद्यकीय केंद्रामध्ये पुरवल्या जातात. परंतु त्यासाठी नजीकच्या पशु वैद्यकीय केंद्रापर्यंत पशुधनास घेवून जावे लागत असते. परंतु पशुधन चालण्यास सक्षम नसेल तर गाडी करून घेवून जावे लागत असते. परंतु आता केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त योजनेद्वारा फिरते पशुचिकित्सा पथकांची स्थापना करण्यात येणार असून त्यापार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात 80 फिरत्या पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी 1962 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून यावर संपर्क केल्यास पथक आपल्या दारी येणार आहे. एक लक्ष पशुधनामागे एक पथक नेमण्यात येणार असून या पथकात एक चारचाकी वाहन, पशुवैद्यक, आवश्यक यंत्रसामग्री आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शिक्षणाच्या बदलत्या वाटा : अभ्यासक्रम आराखड्यामध्ये मूल्यांकनाच्या संदर्भाने नव्याने दृष्टिकोनाची मांडणी

0
संगमनेर | संदीप वाकचौरे| Sangamner शालेय स्तरावरील मूल्यांकन प्रक्रियेबद्दल गेले काही वर्षे सातत्याने संशय व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांना मिळालेले गुण म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता असे...