Wednesday, July 24, 2024
Homeनाशिकरहिवाशी नोंदणी हक्कापासून वंचित

रहिवाशी नोंदणी हक्कापासून वंचित

पुनदखोरे | प्रतिनिधी

- Advertisement -

कळवण शहरातील नगरपंचायत अंतर्गत येणार्‍या रामनगर परिसरातील रहिवाशी ४० वर्ष उलटूनही स्वतःच्या घरांवर मालकी हक्क लावण्यापासून वंचित असून त्यांच्या घरांवर मालकी हक्क नोंदणी लावण्याची मागणी जोर धरत आहे.

कळवण शहरातील जुने गावठाण म्हणजेच आजचे रामनगर अशी ओळख असलेल्या या श्रमिक वस्तीतील अंदाजे ८० टक्के रहिवाशी नागरिकांच्या सदनिका ह्या स्वतःच्या नावावर नसल्याने हा प्रश्न मूक धरू लागला आहे. रामनगर परिसरात अंदाजे ४० ते ५० वर्षापूर्वी राहत असलेल्या काही रहिवाश्यांनी आपली राहती जागा त्याकाळी इनामी अथवा बक्षीसपत्र करून दुसर्‍यांना विकून तेथून स्थलांतर केले होते.

ज्या रहिवाश्यांनी आपली मालमत्ता त्याकाळी दुसर्‍याना विकून बक्षीसपत्र करून इतरस्त्र ठिकाणी स्थलांतर केले होते. आज रोजी त्याच म्हणजे जुन्याच मालकांची नावे उतार्‍यावर दिसत असल्याने रामनगर परिसरात स्थायिक असणार्‍या रहिवाशीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

गत ४० ते ५० वर्षापासून या जागेवर घरे बांधून वास्तव्य करीत असणार्‍या रहिवाशीनी तत्कालीन ग्रामपंचायत, ग्रामपालिका व गेल्या ८ वर्षांपासून नगरपंचायत यांचे घरपट्टी, नळपट्टी, दिवाबत्ती करासह इतर कर आकारणी नियमित भरत असताना या रहिवाशीनां त्यांचे राहत असलेल्या जागेची मालकी हक्क नोंदणी झालेली नसल्याने सर्वच बाबतीत कुचंबना होतांना दिसत आहे.

कर्ज प्रकरण असो किंवा इतर शासन योजनासाठी स्वमालकीचा उतारा नसल्याने या रहिवाशींचा विकास खोळबला असून त्यांची अवस्था आजच्या स्थितीत ” ना घर का ना घाट का? अशी झाली आहे. रामनगर परिसरात साधारण ६०० ते ७०० घरे असून यात नगरपंचायतीला २, ३, व ६ असे प्रभाग जोडले गेले आहेत.

इतक्या मोठया प्रमाणात लोकसंख्या असताना त्यांच्यावर हा अन्याय का? त्यामुळे कळवण नगरपंचायत प्रशासनाने आपल्या स्थरावर पाठपुरावा करून रामनगर परिसरातील रहिवाशीच्या मालमत्तेवर नोंदणी हक्क लावून त्यांना न्याय द्यावा अशी चर्चा जोर धरत आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या