Saturday, May 25, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात दररोज 70 महिला बेपत्ता

राज्यात दररोज 70 महिला बेपत्ता

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

जानेवारी 2023 ते मे 2023 पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यात 5 हजार 610 महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. महाराष्ट्रात दररोज सरासरी 70 महिला बेपत्ता होत आहेत, अशी धक्कादायक माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

- Advertisement -

अनिल देशमुख यांनी सभागृहात माहितीच्या मुद्याद्वारे राज्यातील बेपत्ता महिलांची आकडेवारी सादर केली. ते म्हणाले की, राज्यातील बेपत्ता होणार्‍या महिला आणि मुलींची संख्या अत्यंत धक्कादायक आहे. जानेवारी 2023 ते मे 2023 पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यात 5 हजार 610 महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकीमार्च महिन्यात जवळपास 2 हजार 200 जणी बेपत्ता झाल्याचे देशमुख यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

पुणे शहरात बेपत्ता होणार्‍या मुली आणि महिलांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून या विषयावर सविस्तर चर्चा घडवून आणावी, अशी मागणीही देशमुख यांनी केली. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशपातळीवरच हा प्रश्न गंभीर असल्याचे सांगितले. पण राज्यातून बेपत्ता झालेल्या 90 टक्के महिला-मुली परत आणल्या आहेत. तरीही गृह खात्यावरील चर्चेत या विषयावर आपण सविस्तर उत्तर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या