Thursday, November 21, 2024
Homeधुळेमराठीच्या संवर्धनासाठी सर्वस्तरावर प्रयत्न व्हावे- प्रा.म्हस्के

मराठीच्या संवर्धनासाठी सर्वस्तरावर प्रयत्न व्हावे- प्रा.म्हस्के

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

मराठी भाषा (Marathi language) माणसाच्या मनामनात रुजावी तिचे संवर्धन (Promotion) व्हावे, यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रा.डॉ.सतीश मस्के (Prof. Dr. Satish Muske) यांनी केले.

- Advertisement -

येथील कर्म. आ. मा.पाटील विद्यालयात (Patil Vidyalaya) कविवर्य वि.वा. शिरवाडकर (Kavivarya V.V. Shirwadkar) उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा गौरव दिवस (Marathi Language Pride Day) साजरा करण्यात आला.

यावेळी मराठी ग्रंथ पूजन व प्रतिमा पूजन वरिष्ठ महाविद्यालयाचे व्याख्याते प्रा. डॉ. सतीश श्रीराम मस्के यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या एम.डी.माळी यांनी भुषविले. ज्येष्ठ शिक्षक पी.एच. पाटील, एच.जे.जाधव, मराठी विषयाचे विभाग प्रमुख बी.एस.कोठावदे, डी.व्ही. देशमुख, बी.एच.बागुल, एस.बी.अहिरे उपस्थित होते.

कविवर्य कुसुमाग्रज (Poet Kusumagraj) हे मराठी साहित्यातील एक नावाजलेलं नाव होय. साहित्य माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवते. मराठी राजभाषा गौरव (Marathi Language Pride Day) दिवस हा महाराष्ट्रीयन भाषिक माणसासाठी मराठी संस्कृती संवर्धन आणि संरक्षणाचा दिवस होय, असे प्रा.डॉ. सतीश यांनी व्याख्यानातून सांगितले.

मराठी भाषा गौरव गीत प्रा. एस. जे.शिंपी यांनी गायले. श्रीमती एस.बी. अहिरे यांनी मराठी कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एस .कोठावदे यांनी केले. तर आभार डी.व्ही. देशमुख यांनी मानले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या