Sunday, May 19, 2024
Homeनंदुरबारगल्लीतील प्रत्येक घरावर मुलीच्या नावाची पाटी लागणार

गल्लीतील प्रत्येक घरावर मुलीच्या नावाची पाटी लागणार

तळोदा TALODA| श.प्र.-

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त येथील काका गणेश मंडळाच्या (Kaka Ganesh Mandala) वतीने काकाशेठ गल्ली येथे केंद्र सरकारचा (Central Government) ‘लेक वाचवा लेक शिकवा’ (Save the Lake, Teach the Lake) या कार्यक्रमाअंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणाच्या (Empowerment of women) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलींच्या सन्मानार्थ (honor of girls) गल्लीतील प्रत्येक घराला (every house) मुलीच्या नावाची पाटी (Girl’s name plate) लावून घराला मुलीचे नावे देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यामुळे काका शेठ गल्लीतील (Uncle Sheth Galli) प्रत्येक घर आता मुलीच्या नावाने (Identified girl’s name) ओळखले जाणार आहे, त्यांच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisement -

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उप निरीक्षक प्रिया वसावे होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या अथक प्रयत्नांतून मुलींना शिक्षण मिळत आहे.

खूप शिका आई वडिलांचे नाव लौकीक करा, शिकून जिल्हा पुढे न्या, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय खरच कौटुंबिक हिंसाचार झाल्यावरच पोलीस स्टेशन गाठा, हुंडा पद्धत, पोक्सो कायदा, सायबर लॉ, कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक छळ, हुंडा विरोधी कायदा, ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी करावयाचा उपाययोजनाबाबत त्यांनी माहिती दिली.

छेडखानीच्या वाढत्या प्रकारावर दुर्लक्ष न करता तात्काळ पोलीस स्टेशन गाठा, मुलींच्या शिक्षणावर भर द्या, स्पर्धा परीक्षांकडे लक्ष केंद्रित करा, असे त्यांनी सांगितले. लीना नितीन कर्णकार, इशा पंकज राणे, प्रणाली देवेंद्र राणे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुषमा राजकुळे यांनी केले.सूत्रसंचलन भाग्यश्री राणे यांनी केले. आभार सौ.दीपिका पिंपरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी काका शेठ गणेश मंडळाचे अध्यक्ष किरण राणे, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, सचिव संजय शेंडे व सर्व सदस्यांनी व महिला पुरुषांनी परिश्रम घेतले.

दरम्यान, लेक वाचवा लेक शिकवा या उपक्रमा अंतर्गत काकाशेठ गल्लीतील प्रत्येक घराला लेकीचे नाव देवून मुलींचा सन्मान करण्यात आला. उपनिरीक्षक प्रिया वसावा यांच्या हस्ते घरोघरी मुलींचा नावाची पाटी लावण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या