Tuesday, February 18, 2025
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! तरुणाने प्रेयसीच्या आई व भावाला जिवंत जाळले, नंतर स्वत:लाही घेतले पेटवून

धक्कादायक! तरुणाने प्रेयसीच्या आई व भावाला जिवंत जाळले, नंतर स्वत:लाही घेतले पेटवून

अमरावती | Amravati

अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्याच प्रेयसीच्या आईला आणि भावाला जिवंत जाळलं आहे. त्यानंतर तरुणाने स्वत:ला देखील पेटवून घेत आत्महत्या केली आहे.

- Advertisement -

या धक्कादायक घटनेमुळे अमरावतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी रात्री अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील वंजडी इथे घडली. लता सुरेशराव भोंडे आणि प्रणय सुरेशराव भोंडे अशी जाळून हत्या केलेल्या आई आणि मुलाचे नाव आहे. तर आशिष ठाकरे असे मृत आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीरामपूर दरोडा प्रकरणी खळबळजनक खुलासा! दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन पत्नीनेच आवळला पतीचा गळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशीष ठाकरेचे लता भोंडे यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र, काही महिन्यापूर्वी काही कारणामुळे मुलीने आशीषशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले होते. यामुळे आशीषच्या मनात राग होता. यामुळे रविवारी रात्री आशिषने वरुड तालुक्यातील वंडली इथे रात्री एक वाजताच्या दरम्यान प्रेयसीची आई आणि भावाला घरी जाऊन पेटून दिले. यानंतर त्याने देखील स्वत:ला पेटून घेतले. यात तो गंभीर भाजला गेल्याने त्याचा देखील मृत्यू झाला.

सावळीविहीर हत्याकांडातील चौथ्या जखमीचा मृत्यू

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या