Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाSourav Ganguly Birthday : सौरव गांगुलीबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का?

Sourav Ganguly Birthday : सौरव गांगुलीबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहे का?

मुंबई | Mumbai

भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे (BCCI) माजी अध्यक्ष तसेच माजी कर्णधार सर्व गांगुली (Sourav Ganguly Birthday) आज आपला ५१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रचंड नावलौकिक मिळालेल्या गांगुलीचा जन्म ८ जुलै १९७२ मध्ये चंडीदास निरूपा गांगुली यांच्या घरामध्ये झाला. गांगुलीच्या वडिलांचा प्रिंट हा प्रमुख व्यवसाय होता. सौरभ गांगुलीचा सुरुवातीपासून श्रीमंत कुटुंबामध्ये सांभाळ करण्यात आला होता…

- Advertisement -

सौरव गांगुली क्रिकेटमध्ये द प्रिन्स ऑफ कोलकाता आणि दादा या नावाने ओळखला जातो. तसेच भारतीय संघामध्ये सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्या नेतृत्वामध्ये इंग्लंडमध्ये खेळायला गेलेला २००२ सालच्या तिरंगी मालिकेमध्ये भारतीय संघाने प्रथम विजेतेपद पटकावले होते. त्याचप्रमाणे जे फ्री बायकोच्या इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटू यांनी कोलकात्याचा राजकुमार म्हणून सन्मान केला होता.

ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ… मैं फायर हूँ!; नाशिकमधून शरद पवारांचा हल्लाबोल

गांगुलीने ११३ कसोटी व ३११ वनडे सामन्यामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. १९९६ मध्ये इंग्लंडमध्ये लॉर्ड्स कसोटीमध्ये त्यांनी आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू केली. त्यामध्ये ७२१२ धावा त्यांनी केल्या त्यात १६ शतकांचा समावेश आहे. २५९ त्याची कसोटीतील सर्वाधिक धावसंख्या आहे. एक दिवसीय सामन्यांमध्ये त्याने ११३६३ धावा केल्या असून २२ शतके आणि ७२ अर्धशतकांचा समावेश आहे. १८३ त्याची सर्वाधिक धावसंख्या असून २००८ मध्ये कांगारू विरुद्ध त्याने अखेरची कसोटी खेळली होती.

नितीन गडकरींनी बाळासाहेबांसोबतचा सांगितला तो किस्सा ; म्हणाले, ती इच्छा..

तसेच कसोटीमध्ये गांगुलीने ३२ विकेट तर वनडे सामन्यांमध्ये १०० बळी घेतले आहेत. त्याचप्रमाणे आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे २०१० पर्यंत तीन वर्ष त्याने कर्णधारपद भूषवलेले आहे. त्याचप्रमाणे पुणे वॉरिअर्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून देखील आयपीएलमध्ये काही सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे.

सलिल परांजपे नाशिक

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या