Saturday, July 27, 2024
Homeनाशिक...तर नाशिकच्या माजी महापौरांची होणार चौकशी

…तर नाशिकच्या माजी महापौरांची होणार चौकशी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहे. आता नाशिकच्या गॅरेजमध्ये असलेल्या एका कारमुळे नाशिकच्या एक माजी महापौर अडचणी येणार असल्याची चर्चा आहे. आज त्या कारच्या चालकाची कसून चौकशी नाशिक पोलिसांनी केली असून गरज पहली तर माजी महापौराची देखील चौकशी होणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांंनी दिली.

- Advertisement -

ड्रग्ज माफिया ललित पाटीलचे अनेक बडे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे आरोप होत असते. त्याच आता नाशिक पोलिसांनी एका वाहन चालकाची चौकशी केल्याने त्याला नवीन वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका मोठ्या पक्षाच्या मोठ्या नेत्याचा हा वाहनचालक आहे. ललितच्या अपघातग्रस्त कारची दुरुस्ती करण्यासाठी या वाहनचालकाने मध्यस्थी केल्याचे समजते.

MLA Disqualification Case: विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रतेची आज सुनावणी

यामुळे नाशिकमधील माजी महापौर पोलिसांच्या रडारवर आल्याची चर्चा आहे. पाटील एमडी ड्रग्स तस्करीत उतरण्यापूर्वी नाशिकमध्ये राजकीय क्षेत्रात कार्यरत होता, असे सांगण्यात येते. विविध राजकीय नेत्यांशी त्याचे चांगले संबध होते, असे आरोप देखील होत आहे. यादरम्यान नाशिक शहर पोलिसांनी नाशिक शहरातील एका मोठ्या नेत्याच्या खाजगी वाहनचालकाची आज (दि.25) चौकशी केल्याचे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 2015 मध्ये ललितच्या सफारी कारचा अपघात झाला होता. ही कार नवीन नाशिकच्या एका गॅरेजमध्ये तेव्हापासून पडून आहे. गॅरेज मालकाकडे चौकशी केल्यानंतर पोलीस एका वाहन चालकापर्यंत पोहोचले. हा वाहन चालक माजी महापौरांसाठी काम करत असल्याचे यावेळी समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

पाटील प्रकरणाची पाळेमुळे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागापर्यंत पसरली असून मुंबईच्या पोलिस पथकाने देवळा तालुक्यातील सरस्वती वाडी येथून तीन दिवसांपुर्वी सर्च ऑपरेशन करुन तब्बल 15 किलो ड्रग्ज हस्तगत केले आहे. ललित पाटीलने पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा चालक सचिन वाघ याच्या मदतीने लोहोणेर येथे गिरणा नदीपात्रात ड्रग्जच्या 12 किलोच्या आठ बॅगा फेकल्याने त्याचाही शोध मंगळवारी पहाटे अडीच्या सुमारास मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी सुरु केला.

दोन टप्प्यांत तब्बल 14 तास मोहीम राबवली. त्यानंतर आता नाशिकच्या एमडी ड्रग्जप्रकरणी गुन्हे शाखेकडून एका माजी महापौराची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. ललित पाटीलची जुनी गाडी या नेत्याकडे होती. असे सांगण्यात येत आहे.

Round the Wicket: दक्षिण आफ्रिकेचे बझ क्रिकेट

- Advertisment -

ताज्या बातम्या