मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश सुरु झाले आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे चित्र होते. भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज (दि. २२) जाहीर प्रवेश केला. त्यामुळे अजित पवारांना विदर्भात मोठे बळ मिळणार आहे.
माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश झालाय. त्यामुळे राष्ट्रवादीला विदर्भात बळ मिळणार असल्याचे मानले जाते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदियात राष्ट्रवादीला बळ मिळणार आहे. राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.
सामाजिक न्याय मंत्री म्हणून बडोले यांनी काम केले आहे. त्यांचा भाजपला राम राम हा भाजपसाठी पूर्व विदर्भात धक्का म्हणता येईल. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांचे यश म्हणता येईल. बड़ोले यांची मोरगाव अर्जुनी (जिल्हा गोंदिया) विधानसभा येथून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या पक्षप्रवेशाचे टायमिंग कितपत जुळणार हे येणारा काळच सांगणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा