Friday, May 3, 2024
Homeनाशिकअभ्यास केलेल्या विषयांचीच हाेणार परीक्षा

अभ्यास केलेल्या विषयांचीच हाेणार परीक्षा

नाशिक | Nashik

अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या विषयांची तयारी करणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाने दिलासा दिला असून, केवळ या वर्षासाठीच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून वगळलेल्या विषयांची परीक्षा देण्याची परवानगी शिक्षण विभागाने दिली आहे.

- Advertisement -

यंदाच्या वर्षापासून बारावीसाठी सुधारित विषय आणि मूल्यमापन योजना निश्‍चित केली आहे. यानुसार शाखानिहाय गट ए, बी, सीमध्ये विषयांची विभागणी केली आहे. काही विषय अभ्यासक्रमातून रद्द केले आहेत. ८ ऑगस्ट २०१९ रोजी या विषयीचा अध्यादेश जारी केला होता; मात्र कनिष्ठ महाविद्यालये आणि शिक्षकांचे या अध्यादेशाकडे दुर्लक्ष झाले.

त्यामुळे शिक्षकांनी जुन्याच विषय योजनेनुसार विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू ठेवला. परिणामी जे विषय अभ्यासक्रमातून वगळले आहेत त्या विषयांची विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेच्या दृष्टीने तयारी केली. बारावी परीक्षेचे अर्ज भरतेवेळी ही बाब समोर आली.

जे विषय वगळले ते परीक्षा अर्जातूनही गायब होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना फक्त यंदाच्या वर्षापुरती जुन्या विषयांची परीक्षा देण्याची मान्यता दिली आहे.

जुन्या विषयांनुसार परीक्षा देण्याची सवलत केवळ यंदाच्या परीक्षेपुरती असून, वर्ष २०२१-२२ पासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार नाही. महाविद्यालयांनीही बंद झालेल्या विषयांचे किंवा शाखेसाठी उपलब्ध नसलेल्या विषयांचे अध्यापन तातडीने बंद करावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. जुन्या विषयांची परीक्षा देणारे जे विद्यार्थी त्या विषयात किंवा अन्य विषयांत नापास होतील त्यांना पुन्हा तोच विषय घेऊन फेरपरीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या