धुळे । dhule प्रतिनिधी
शहरातील पेठ विभागातील ग.नं. 5 येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (Public Works Department) गेल्या महिनाभरापुर्वी सुरू असलेले रस्त्याचे काम (road work) बंद पडले (shut down) आहे. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करावी यासाठी उबाठा शिवसेना उपमहानगरप्रमुख संदीप चौधरी यांनी आज आंदोलन केले.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या महिनाभरापासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ग.नं.5 येथील रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू होते. सद्यःस्थितीत ते बंद आहे. ठेकेदाराने वर्कऑर्डर प्रमाणे रस्ता न करता रस्ता खोदुन त्यावर माती व खडी टाकली आहे. त्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच या रस्त्यावरून पायी चालणे देखील अवघड झाले आहे. यासंबंधी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सदर कामात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकार्यांच्या मुक संमतीने भ्रष्टाचार होत असल्याचा संशय नाकारता येत नाही.
VISUAL STORY # मानसी नाईक पुन्हा नववधू ?जळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळ
त्यामुळे सदर रस्ता लवकरात लवकर नियमानुसार तयार करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला आहे. आंदोलनात संदीप चौधरी. कैलास मराठे, रविराज जाधव, हितेश जैन, चेतन अग्रवाल, अमोल सावळे, कुंदन गवळी, सुनिल बागूल, शिंदे गटातील भूषण बागूल, युगेंद्र कोटेचा, सुभाष सोनवणे, वसंत जैन अमोल मोरे, केतन जैन, प्रितेश छाजेड, ओमप्रकाश जैन, सुधाकर घोडके, रवींद्र जोहरी, नितीन कांबळे, अॅड.महेश वाघ, संजय अग्रवाल, अमानोद्दीन शिवलिकर, सचिन खंडेलवाल, दीनेश कासार, सैय्यद सलीम, सुरेश कासार आदी सहभागी झाले होते.
VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण