Thursday, June 20, 2024
Homeमुख्य बातम्यापक्षाच्या नावासह धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याने शिवसेनेच्या गोटात उत्साह

पक्षाच्या नावासह धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याने शिवसेनेच्या गोटात उत्साह

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

राज्यातील सत्ता संघर्षाचे लढाई सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरू असले तरी निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (shiv sena) नाव तसेच धनुष्यबाणचिन्हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गटाला दिल्यामुळे शिवसेनेत कमालीचा उत्साह वाढला आहे,

तसेच दोन दिवसापूर्वी औरंगाबाद (Aurangabad) तसेच अहमदनगरचे (Ahmednagar) नामांतराची घोषणा देखील झाल्यामुळे शिवसैनिकांनी नाशिक (nashik) मध्ये जल्लोष साजरी केला आता नाशिक महापालिकासह (Nashik Municipality) इतर निवडणूककडे (election) शिवसेनेचे लक्ष असल्याचे दिसून येत आहे. नाशिक तसा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असताना देखील त्यांनी नाशिक वर विशेष लक्ष दिले होते.

आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचे अनेक दौरे नाशिकला झाले आहे तर नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने थेट मुंबईला (mumbai) देखील काही बैठका घेऊन कामाला चालना दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले आहे. राज्यात विविध भागातील शिवसेनेचे नेते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केले आहे. सुरुवातीला नाशिकमध्ये शिवसैनिक (shiv sainik) जाणार नाही, असे चित्र होते. मात्र हळूहळू शिवसेनेसह इतर पक्षातील अनेक माजी नगरसेवक, नेते यांनी शिंदे यांच्या नेतृत्वात काम करायला पसंती दिल्याचे दिसून आले.

सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच खासदार शिवसेनेचे असल्यामुळे पक्षाचे संघटन जिल्ह्यासह नाशिक शहरात मजबूत झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच अधिकृत शिवसेना मुख्यमंत्री यांच्याकडे आल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. त्यामुळे दिल्ली (delhi) पासून दिल्ली पर्यंत आता लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) देखील तयारी सुरू झाली आहे तसेच विधानसभा निवडणूक देखील याच काळात होणार असल्यामुळे त्याचे नियोजन सुरू झाले आहे. तर नाशिक महापालिका देखील आपल्या हातात घेण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे.

लोकसभेसाठी इच्छुक

नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) मागील दोन टर्म पासून शिवसेनेचे खा. हेमंत गोडसे (MP Hemant Godse) हे प्रतिनिधित्व करीत आहे. तर 2019 मध्ये महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) प्रयोग झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने देखील नाशिक लोकसभेवर आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली होती. आता युतीचे सरकार राज्यात असल्यामुळे शिवसेनेसह भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांची मोठी गर्दी लोकसभेसाठी पाहायला मिळत आहे.

मध्यंतरी देशाचे गृहमंत्री अमित शहा ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते त्यांनी राज्यातील 48 लोकसभेचे जागा जिंकण्याच्या विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह वाढला आहे. आता नाशिक लोकसभेची जागा शिवसेना सेनेला मिळते की भारतीय जनता पक्ष आपला उमेदवार उभा करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

विधानसभेच्या जागांवर लक्ष

2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील चार पैकी तीन जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिंकल्या होत्या. तर 2014, 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील चार पैकी तीन जागा भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे खेचून आणल्या होत्या. दरम्यान 2019 ला शहरातील देवळाली मतदार संघात राष्ट्रवादीने आपला उमेदवार निवडून आणला होता. सध्या शहरातील चार पैकी तीन भाजपा तर एक जागा राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येतात, भारतीय जनता पक्ष किती जागांवर लढतो, हे पाहणे देखील रंजक राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या