नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात कम्प्युटरसह (Computer) त्यातील ॲक्सेसिरिजची विक्री करणाऱ्या अठरा दुकानदारांना एका ठगाने ४८ लाख ३३ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. दुकानदारांकडून (Shopkeepers) माल खरेदी करतांना या ठगाने ‘पाेस्ट डेटेट’ चेक देऊन त्यांना मालाचे पैसे देताे असे सांगून गेल्या सहा महिन्यांपूर्वीच पळ काढला असून त्याने संबंधितांना दिलेला निवासी पत्ता, आधारकार्ड बनावट असल्याने दुकानदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीवेळी गोंधळ; शिवसेनेने घेतला आक्षेप
याबाबत अधिक माहिती अशी की, मंदार पाटील(रा. नाशिक) असे संशयित एजंटचे नाव असून आता त्याचा शाेध आर्थिक गुन्हेशाखा व सरकारवाडा पाेलीस घेत आहे. संशयित मंदार पाटील हा खासगी एक्झक्युटीव्ह (प्रतिनिधी) असून ताे कॅनडा काॅर्नरवरील आयमॅक्स टेक्नाॅलाॅजी या कम्प्युटर सेंटरमार्फत मालाची पुरवठा करत हाेता. दरम्याान, गेल्या दाेन ते तीन वर्षांपासून शहरातील विविध कम्प्युटर, लॅपटाॅप विक्रेत्यांशी व दुकानदारांच्या ताे संपर्कात हाेता. त्याने जयेश संजय पेंढारकर(रा. सप्तशृंगी अपार्टमेंट, तिडके नगर, नाशिक) याच्याशी ओळख वाढवून १७ डिसेंबर २०२३ ते २२ डिसेंबर २०२४ या कालावधीत त्याच्या कम्प्युटर विक्री दुकानातून हार्डडिस्क, एलईडी, ईनव्हर्टर, यूएसबी केबल, माऊस, कि बाेर्ड, अन्य यंत्र सामग्री खरेदी केली.
हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेत पुन्हा गोंधळ
प्रारंभी दुकानदारांचा विश्वास बसावा, यासाठी राेख स्वरुपात व्यवहार केले. त्यामुळे पेंढारकर यांचा विश्वास दृढ झाल्याने त्यांनी तब्बल १७ लाख ५४ हजारांचा माल, ॲक्सेसिरिज मंदारकडे साेपविली. दरम्यान, याचवेळी मंदारने त्यांना माल खरेदीचे ‘पाेस्ट डेटेड’ चेक(धनाकर्ष) दिले. त्यांनी ते वटविण्यासाठी बँकेत टाकले असता, ते ‘बाऊन्स’ झाले. त्यामुळे पेंढारकरला धक्काच बसला. त्याने ओळखीतील दुकानदारांना संपर्क केला असता, पेंढारकरसह इतर १७ व्यावसायिकांकडूनही सुमारे ३१ लाख रुपयांचा माल खरेदी करत पैसे दिले नसल्याचे समाेर आले.
हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेच्या गोंधळाची उद्धव ठाकरेंनी घेतली दखल
तसेच त्यांनाही पाेस्ट डेटेड चेक दिल्याचे समाेर आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात सर्व १८ व्यावसायिकांनी मंदार याला त्या-त्यानेळी व्हाटस्ॲप, माेबाईलवर संपर्क केला. मात्र त्याने व्यवसायात ताेटा झाल्याचे व पार्टनरचा अपघाती मृत्यू झाल्याचे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली. यानंतर फसवणूक झालेल्या सर्व अठरा व्यावसायिकांनी सरकारवाडा पाेलीस ठाणे गाठून कैफियत मांडली. त्यानुसार मंदारवर फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा नाेंद झाला आहे.
हे देखील वाचा : देशदूत राजकीय विशेष : नाशिकच्या राजकारणात ‘बुलडोझरबाबा’ची एन्ट्री
मित्र दगावल्याचे कारण
मंदार याने दुकानदारांना दिलेले चेक वटत नसल्याने पेंढारकरसह अन्य व्यावसायिकांनी त्याला संपर्क केला. मात्र, त्याचा मोबाईल फोन स्विच ऑफ हाेता. यानंतर दुकानदारांनी त्याच्या व्हॉटअपवर मेसेज केला असता त्याने रिप्लाय दिला. तेव्हा त्याने ‘माझ्या पार्टनरचा अपघाती मृत्यू झाला असून, मी अपघाताचे फाेटाे तुम्हाला सेंट केले आहे असे कळविले. तर, मला जे चेक भेटले आहेत ते बाऊंस झाले आहेत, ते पैसे घेण्यासाठी सुरत येथील पार्टीकडे तीन दिवसांकरिता आल्याचे सांगितले. त्यानंतर पेंढारकर यांनी विश्वास ठेवत पुढील दोन ते तीन दिवस वाट पाहिली. परंतु त्यानंतर त्याचा फोन व व्हॉट्अँप देखील बंद आढळला. दरम्यान, मंदार याने ४८ लाख रुपयांचा माल उचलून त्याची विल्हेवाट लावत पसार झाला आहे. तपास उपनिरीक्षक सुनील चव्हाण करत आहेत.
दुकान बंद, निवासाचा पत्ता बनावट
मंदार याच्या कॅनडा काॅर्नरवरील दुकानास टाळे असून तक्रारदार व इतर व्यावसायिक त्याचा शाेध घेता घेता त्याच्या घरी गेले. तेथेही ताे सापडला नाही. तर, त्याच्या आधारकार्डवरील पत्त्यावर जात शोध घेतला असता तो तेथेही मिळाला नाही. तर अधिक चाैकशीत ताे येथे कधी राहत नव्हता असे समाेर आले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा