Wednesday, July 24, 2024
Homeनाशिकजिल्हा परिषद मुख्यालयाची रंगरंगोटी; पुन्हा नव्याने निविदा काढणार

जिल्हा परिषद मुख्यालयाची रंगरंगोटी; पुन्हा नव्याने निविदा काढणार

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

जिल्हा परिषद मुख्यालयाची रंगरंगोटी व देखभाल करीत असलेल्या ठेकेदाराने मुदतीत काम न केल्याने सदर ठेकेदारांचा थेट कंत्राट रद्द करण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गत महिन्यात दिले होते.ठेकेदाराकडून खुलासा मागविला आहे. ही शासकीय कार्यवाही झाल्यानंतर कंत्राट रद्द केला जाईल. कंत्राट रद्द झाल्यानंतर पुन्हा नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी सांगितले.

जिल्हा परिषद मुख्यालयातील इमारतीच्या डागडुजी आणि रंगरंगोटीसाठी ४७ लाखाचे कंत्राट सार्वजनिक बांधकाम विभाग एकच्या माध्यमातून देण्यात आले होते. निविदेनुसार तीन महिन्याच्या आत इमारतीची डागडुजी आणि रंगरंगोटी पूर्ण करणे अपेक्षित होते.

मात्र मुदतीत काम न पूर्ण न झालेले नाही. इमारतीला कुठला रंग द्यायचा याचा कोणताही निर्णय वेळात घेण्यात आला नव्हता. इमारतीची डागडुजीची कामे अद्यापही बाकी आहेत. गळतीचे ठिकाणे निश्चित झालेली असताना देखील, गळती रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही केलेली नव्हती.

शिक्षण विभागातील गळतीबाबत देखील आदेश देऊन कार्यवाही झाली नव्हती. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी इमारतीच्या जाळ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, जिन्याचे कठडे यांना रंग देण्यात आला.

सामान्य प्रशासनविभागाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाकडे जाणार्‍या जिन्याला काळ्या रंगाचे चमकदार कडप्पे प्रशासनाशी चर्चा न करता, फर्शीचे सॅम्पल न दाखविता जुन्या चांगल्या पायर्‍या तोडून नवीन काळ्या रंगाचे चमकदार कडप्पे बसविण्यात आले. या कडप्प्यांवरुन पाय घसरण्याची भीती होती. कामे वेळेत करावी, गळती रोखावी यासाठी कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी देखील वेळोवेळी संबंधित ठेकेदारास सूचना केल्या होत्या.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या