Friday, September 20, 2024
Homeराजकीयअहमदनगर जिल्हा सरपंच परिषदेचा विस्तार

अहमदनगर जिल्हा सरपंच परिषदेचा विस्तार

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

- Advertisement -

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या कोअर कमिटीची सभा मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवून,शासकीय नियम पाळून हिंगणगाव ता-नगर येथील आदर्श ग्रामपंचायतीच्या सभागृहांमध्ये सरपंच परिषदेचे राज्याध्यक्ष दत्ता काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते,प्रदेश सचिव विकास जाधव,महिला प्रदेश उपाध्यक्ष अश्विनीताई थोरात यांच्या उपस्थितीत पार पडली.

अहमदनगर जिल्हा पदाधिकार्‍यांच्या निवडी अनिल गीते यांनी जाहीर केल्या त्यानंतर प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी आदर्श सरपंच आबासाहेब सोनवणे ,हिंगणगाव ता-नगर यांची अहमदनगर जिल्हाध्यक्ष (दक्षिण), सरपंच मालुन्जा ता-श्रीरामपूर निवृत्ती बडाख यांची अहमदनगर जिल्हाध्यक्ष (उत्तर),सौ.निर्मला मालपाणी राहुरी यांच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष (महिला) तसेच सरपंच वडुले खुर्द ता-शेवगाव बाळासाहेब आव्हाड अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष (दक्षिण) यांना नियुक्तीपत्र प्रदान केली. नवनियुक्त वरील चारही जिल्हा पदाधिकाऱ्यांची फेटे बांधून,शाल,श्रीफळ,बुके देऊन दत्ता काकडे,अनिल गिते,विकास जाधव,अश्विनीताई थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी अध्यक्षपदावरुन बोलताना राज्याचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी सरपंच परिषदेच्या कामाचा आढावा घेऊन ग्रामपंचायती आणि सरपंच त्यांच्यासमोरील प्रश्न व आव्हाने यासंबंधी मार्गदर्शन केले.सरपंच परिषदेची मुहूर्त वेढ ग्रामविकासाचे शिल्पकार अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी येथूनच झालेली आहे.सरपंच परिषदेच्या माध्यमातून सरपंचाच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याचे काम अत्यंत चांगले असल्याचे त्यांनी सांगितले.नवीन पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायत,सरपंच,उपसरपंच,सदस्य यांच्या अडचणी सोडवण्याचे व सरपंच परिषदेच्या माध्यमातून उत्कृष्ट संघटन करून सर्वांना न्याय देण्याची भूमिका ठेवून सक्षम ग्रामपंचायत व सन्मानित सरपंच उभे करण्याची उमेद बाळगून काम करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी उपाध्यक्ष अनिल गीते पाटील,सचिव विकास जाधव,उपाध्यक्ष अश्विनीताई थोरात यांनी मार्गदर्शन करून नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

१)आदर्श सरपंच आबासाहेब सोनवणे,अहमदनगर जिल्हाध्यक्ष (दक्षिण),

२)निवृत्ती बडाख,अहमदनगर जिल्हाध्यक्ष (उत्तर)

३)सौ.निर्मलाताई मालपाणी, अहमदनगर जिल्हाध्यक्ष (महिला)

४)बाळासाहेब आव्हाड,अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष (दक्षिण)

याप्रसंगी कर्जत तालुका अध्यक्ष नानासाहेब पांडुळे,श्रीगोंदा तालुका अध्यक्ष विजय शेंडे,नगर तालुका महिला अध्यक्ष राजश्री लोटके,नगर तालुका महिला उपाध्यक्ष अर्चना कुलट, नगर मार्केट कमिटीचे माजी सभापती व वाकोडीचे सरपंच हरिभाऊ कर्डिले,पडेगावचे सरपंच प्रशांत लिप्ते,ब्राह्मणगाव वेताळचे सरपंच राधाकृष्ण आहेर,एरंडगाव ता-शेवगाव सरपंच गोकुळ भागवत,कान्हूर पठार सरपंच अलंकार काकडे,चिचोंडी पाटील नगरचे अशोकराव कोकाटे,टाकळी काझीचे अशोक ढगे,बुरुडगावचे बापू कुलट,हिंगणगाव माजी सरपंच स्मिताताई सोनवणे,ग्रामपंचायत सदस्य निलम दुबे इत्यादी उपस्थित होते.नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार दत्तात्रय नाना सोनवणे,मुकुंद दुबे सर,भरत कांडेकर सर,निसार चाचा पठाण,इन्नूस सय्यद,संभाजी कोल्हे यांनी केले.सर्वांचे आभार आबासाहेब सोनवणे यांनी मानले.

यानंतर सर्वांनी हिंगणगावचे जलयुक्त व कोल्हापूर बंधारे साखळी प्रकल्प,नदीजोड प्रकल्प व इतर विकास कामांची पाहणी केली आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वडाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या