Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यापेट्रोल हद्दपार करा

पेट्रोल हद्दपार करा

अकोले । प्रतिनिधी

राज्यातून पेट्रोल-डिझेलला ( Petrol- Diesel ) हद्दपार करा, शेतकर्‍यांचा पेट्रोलचा खर्च वाचवा. शेतकरी फक्त अन्नदाता नाही तर ऊर्जा दाता बनला पाहिजे, असे आवाहन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari)यांनी केले.

- Advertisement -

पाण्यातून ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळं करता येणं शक्य आहे. भविष्यात रेल्वे, विमानं, गाड्या आणि कारखाने हायड्रोजनवर चालणार असल्याचा दावाही त्यांनी केला. माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड (BJP leader Madhukarrao Pichad)यांचा 81 वा अभिष्टचिंतन सोहळा अकोले येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ना. गडकरी बोलत होते.

पुढच्या महिन्यापासून फ्लेक्स फ्युएल इंजिन असलेल्या स्कुटर, रिक्षा, ट्रक, कार, बस बाजारात येणार आहेत. या संपूर्ण इथेनॉलवर चालू शकतील अथवा इथेनॉल व पेट्रोलच्या मिश्रणावर चालतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आज गहू स्वस्त पण ब्रेड बिस्कीट महाग, फळे स्वस्त पण फळांचे रस महाग, टोमॅटो स्वस्त पण केचप महाग अशी स्थिती आहे. हा कच्चा माल वापरून शेतकर्‍यांच्या जीवनात संपन्नता कशी आणता येईल याचा विचार झाला पाहिजे असेही ते म्हणाले. देशात 186 मतदार संघात ऊस उत्पादक शेतकरी आहेत. ऊस हे शेतकरी विकासाचे मापदंड मानले गेले आहे. या वर्षी देशात 340 लाख टन साखर उत्पादन झाले. 80 लाख टन साखर मागील वर्षीची शिल्लक आहे.आणि देशाची गरज आहे फक्त

280 लाख टन.त्मामुळे साखरे ऐवजी आता अन्म उत्पादनाकडे वळण्माची गरज त्यांनी व्यक्त केली. इथेनॉल 60 रु लिटर आहे तर पेट्रोल 120 रु. संशोधनाने इथेनॉनचे कॅलरी मूल्य आता पेट्रोल एवढे झाले आहे. आपण दरवर्षी 10 लाख कोटी रुपयांचे इंधन आयात करतो. हे पैसे शेतकर्‍यांचे घरात गेले पाहिजेत.

स्कुटर, रिक्षा, कार सर्वच गाड्या इथेनॉल वर चालणार्‍या येत आहेत. इंधन म्हणून भविष्यात हैड्रोजन चा वापर होणार आहे. हैड्रोजन मिशन साठी केंद्र सरकारने 3 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या सर्वांसाठी पारंपरिक दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे असे सांगतानाच तरुण नेत्यांनी हे मिशन हाती घेत जिल्ह्यातून पेट्रोल हद्दपार करावे असे आवाहन त्यांनी केले. नगर -मनमाड रस्त्याचे काम बंद पडले आहे. या कामाची लवकरच फेरनिविदा काढण्यात येणार असल्याचे ना. गडकरी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या