Saturday, September 14, 2024
Homeनाशिककालबाह्य मतदान यंत्र नष्ट करणार

कालबाह्य मतदान यंत्र नष्ट करणार

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

- Advertisement -

निवडणुकीसाठी जिल्ह्यात वापरण्यात आलेली एम-1 प्रकारातील कालबाह्य झालेली मतदान यंत्र नष्ट करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील 12 हजार 795 यंत्र नष्ट केली जाणार आहेत. संबधित उत्पादक कंपनीकडे नष्ट करण्यासाठी पुन्हा रवाना करण्यात आली आहे.

निवडणुकीसाठी आयोगाने आता अद्यावत असे ईव्हीएम, व्हिव्हिपॅट व कंट्रोल यंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. शिवाय व्हीव्हीपॅट या अद्यावत पध्दतीमुळे ईव्हीएमवर होणारे आरोपांवरही आळा बसला आहे. त्यामुळे जे मशीन्स कालबाह्य ठरले आहेत, ज्यांच्यावर आरोप होण्याची शक्यता आहेत. 2006 सालापुर्वीचे मशीन अखेर भारत निवडणूक आयोगाने नष्ट करण्याच्या सूचना यापुर्वीच दिल्या आहेत.

त्यानुसार जिल्ह्यातील यंत्र ही सध्या कुठल्याही निवडणुका नसल्याने ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी निवडणूक विभागाने नष्ट कऱण्याची प्रक्रीया पूर्ण केली आहे. त्यात मेरी येथील गोदामात ठेवलेल्या या यंत्रांची फेर तपासणी मागील आठवडाभरापासून निवडणूक विभागाकडून सुरु होती. आता ही प्रक्रीया जवळपास पूर्ण झाली आहे.

त्यानुसार ही कालबाह्य झालेली 12 हजार 795 मतदान यंत्र ट्रकमध्ये लोंडींग करण्याचे काम सुरु आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमीटेड, या कंपनीचे 5 हजार 952 बॅलेट युनीट आणि 6 हजार 273 इतके कंट्रोल युनिट नष्ट कऱण्यासाठी पाठविले जाणार आहेत.

तर पुण्यातील बेल कंपनीचे 570 बॅलेट युनिट पाविण्यात येणार आहे. हे सर्व यंत्र संबधित कंपन्यांना पाठविण्यासाठी तब्बल 12 ट्रकची आवश्यकता आहे. ही वाहाने एमएसआरटीसी च्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या