भंडारा | Bhandara
भंडाऱ्यातील जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. फॅक्टरीच्या आर. के. ब्रांच सेक्शनमध्ये हा ब्लॉस्ट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. साबुदाण्यासारखा कच्चा माल जो आरडीएक्स बनवण्यासाठी वापरला जातो. त्यामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये मोठ्याप्रमाणात जीवित हानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र प्रशासनाने अद्याप याला दुजोरा दिला नाही.
- Advertisement -