Friday, February 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' नोंदणीसाठी मुदतवाढ

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ नोंदणीसाठी मुदतवाढ

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना 30 सप्टेंबर 2024 अर्ज करता येईल. महिला आणि बालविकास विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला.

YouTube video player

राज्य सरकराने जून महिन्यात राज्याचा सन 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा केली होती. या योजनेनुसार पात्र महिलांच्या बँक खात्यात महिना 1 हजार 500 रुपये जमा करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने 1 जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरु केली. सरकारच्या या योजनेला राज्यभरातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...