Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूज'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत सहभागी होण्यासाठी १५ ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत सहभागी होण्यासाठी १५ ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ

महिलांनी लाभ घेण्याचे पालकमंत्री दादा भुसेंचे आवाहन

- Advertisement -

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा सध्या राज्यात बोलबाला सुरू आहे. तीन हप्ते आल्यामुळं महिलांमध्ये आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. या योजनेत सुरुवातीला अर्ज दाखल करण्याची 31 ऑगस्ट तारीख होती. परंतु महिलांचा वाढता प्रतिसादामुळं अर्ज दाखल करण्याची तारीख 31 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, या मुदतीतही अनेक महिलांनी काही कारणामुळं अर्ज दाखल केले नव्हते. पण अशा महिलांना आता अर्ज (Application) दाखल करण्यासाठी 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.

या योजनेतील ऑगस्ट महिन्यात दोन हप्ते मिळाले आहेत. तर 29 सप्टेंबरपासून तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. पण ज्या महिलांचे बँकेत खाते नव्हते. ज्या महिलांचे आधार कार्ड नव्हते किंवा अन्य कागदपत्रं नव्हती, अशा महिलांनी या योजनेचा अर्ज दाखल केला नव्हता. परंतु आता या महिलांनी आधार कार्ड बँकेशी लिंक केलं आहे. अन्य कागदपत्रे जमवली आहेत अशा महिलांना नवीन अर्ज दाखल करता येणार आहेत. मुदत वाढल्याने महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नाशिक जिल्ह्यात देखील मोठ्या संख्येने महिलांनी या योजनेत सहभाग घेतला असून ज्या महिला या योजनेपासून वंचित आहेत अशा महिलांनी आपले कागदपत्र अपलोड करून नाव नोंदविण्याचे आवाहन नाशिक जिल्हा पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. या निर्णयामुळे महिला वर्गाला फायदा होणार असून पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मुदत वाढीच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...