Tuesday, November 26, 2024
Homeधुळेशिक्षकाचा महिलेसोबत आक्षेपार्ह व्हिडिओ काढून 7 लाखांच्या खंडणीची मागणी

शिक्षकाचा महिलेसोबत आक्षेपार्ह व्हिडिओ काढून 7 लाखांच्या खंडणीची मागणी

धुळे dhule । प्रतिनिधी

शिक्षकाला मारहाण (Beating teacher) करीत त्यांचे महिलेसोबत (woman) आक्षेपार्ह व्हीडीओ (Offensive video) काढून ते नातेवाईकांमध्ये व्हायरल (Viral) करण्याची धमकी देत 7 लाखांची खंडणी (Extortion) मागणार्‍या तिघांवर पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

- Advertisement -

याबाबत धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे राहणार्‍या 54 वर्षीय शिक्षकाने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ते दि. 11 रोजी दुपारी अकलाड मोराणे येथे राहणार्या त्याच्या ओळखीच्या महिलेसह दुचाकीने नगाव ते कुसुंबा रोडने जात होते. तेव्हा दुपारी एक ते दीड वाजेदरम्यान ते वडेल शिवारातील नाल्याजवळ शौचासाठी थांबले. तेव्हा दोन अज्ञात तरूणांनी त्यांना मारहाण करीत धमकी देवून त्यांचे महिलेसोबत अर्धनग्न अवस्थेतील व्हीडीओ मोबाईलमध्ये काढला. तो शिक्षकाच्या परिचयातील किरण उत्तम शिंदे ( रा. देवपूर) याच्या मदतीने तो व्हीडीओ शिक्षकाच्या नातेवाईकांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देवून शिक्षकाकडे सात लाख रूपयांची मागणी केली. पुढील तपास पोहेकाँ गायकवाड करीत आहेत.

वाहनाच्या धडकेत पादचारी महिला ठार

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकत पादचारी वृध्द महिला ठार झाली आहे. मिताबाई सत्तु मारनर (वय 65 रा. पंढरपूर ता. साक्री) असे वृध्देचे नाव आहे. त्या काल दि. 13 रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नवीन बायपास रोडवर केमीकल फॅक्ट्रीसमोर रस्ता क्रॉस करीत होत्या. त्यादरम्यान त्यांना सुरतकडून धुळ्याच्या दिशेने जाणार्‍या भरधाव अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. त्यात गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जंगलू महारू महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनावरील चालकावर साक्री पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोहेकाँ कांबळे करीत आहेत.

व्यावसायीकावर जिवघेणा हल्ला

रिक्षाचा कारला धक्का लागल्याच्या कारणावरून इरफान अबुबकर मुल्ला (वय 32 रा. प्लॉट नं. 42, मुल्ला कॉलनी, धुळे) यांना शाहरूख हारून पिंजारी, पापा गोल्डन हारून पिंजारी, अयान हारूण पिंजारी, अयाय हारूण पिंजारी यांनी लोखंडी रॉडने डोक्यावर व हातावर मारून जखमी केले. ही घटना काल दि. 13 रोजी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास शंभर फुटी रोडवर घडली. याबाबत इरफान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांवर चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या