चाळीसगाव । मनोहर कांडेकर
- Advertisement -
चाळीसगाव गेल्या सहा माहिन्यापासून शांताबाई अकाऊंटच्या माध्यामातून सोशल मिडियावर धुमाकूळ घालणार्या शांताबाईच्या माध्यमातून अनेकांकडून त्यांची बदनामी न करण्यासाठी खंडणीचा गोरखधंदा उघडकीस आला आहे.
शहरातील एका शिक्षकांकडून त्याची बदनामी थांबविण्यासाठी 30 हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी आज दि.१४ रोजी चाळीसगाव पोलीस स्टेशनला रणजीतकुमार सुदेशकुमार दराडे, पत्रकार मुराद ईब्राहीम पटेल, इम्रान शेख शब्बीर (राजू किंग) व त्यांचे इतर साथीदारांविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यामुळे चाळीसगावात एकच खळबळ उडाली आहे.