चोपडा – Chopada
गेल्या आठ महिन्यापासून कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातल्याने देशात लाॅकडाऊन करण्यात आला होता.लॉकडाऊन फटका राज्य परिवहन महामंडळाला मोठ्या प्रमाणात बसला. यात ग्रामीण व लांब पल्लाच्या सर्वच फेऱ्या बंद होत्या.कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारने लॉकडाऊन शिथील केल्याने चोपडा आगारातून एसटीच्या लांब पल्ल्याच्या काही फेऱ्या सुरु करण्यात आल्या त्यास प्रवाश्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सोबत ग्रामीण भागातील फेऱ्या देखील सुरु करण्यात आल्याने चोपडा आगाराच्या उत्पन्नात दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे लालपरी पुन्हा रुळावर येतांना दिसत आहे
चोपडा आगारातून ६ माल वाहतूक,६३ नियते, ३३० फेऱ्यासह २३ हजार किलोमीटरचे भाडे साडेचार लाख ते पाच लाखावर उत्पन्न येत आहे. परंतू यात नियमितता नसल्याने प्रवाश्यांचे हाल होत होते.
चोपडा आगारातर्फे लांब पल्लाच्या फेऱ्यांमध्ये मुबंई, संध्याकाळी १८:३० पुणे संगमनेर मार्गे सकाळी ६ वाजता व नगरमार्गे संध्याकाळी १७:१५ वाजता वाशी सकाळी ७:३० वाजता,औरंगाबाद ८वाजता पनवेल ८:३०, चाळीसगाव सकाळी ६: वाजता व ८:१५ वाजता, आंतरराज्य सुरत सकाळी ७:१५ व १० वाजता,वापी सकाळी ९ वाजता,बडोदा सकाळी १० वाजता,इंदौर सकाळी ६:४५ वाजता बुऱ्हाणपूर जाणेसाठी नियमित फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत.दिवाळी निमित्त खास पुणे, नाशिक व सुरत जाणेसाठी जादा बसेस सोडण्यात येत आहेत.तसेच जळगावहून धानोरा- अडावद मार्गे रात्री ८ नंतर बस नसल्याने असंख्य प्रवाश्यांचे हाल होत होते.यासाठी रात्री ९ वाजता जळगाव येथून व्हाया इदगाव- धानोरा-अडावद मार्गे बस सोडण्यात येणार आहे.प्रवाशी बाधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन आगार पंकज महाजन प्रमुख यांनी केले आहे.