Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशकात आढळला अतिदुर्मिळ दुतोंड्या साप

नाशकात आढळला अतिदुर्मिळ दुतोंड्या साप

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विठ्ठलनगरमधील (Vitthalnagar) हनुमान मंदिराच्या (Hanuman Temple) परिसरात अतिदुर्मिळ मांडूळ साप (Mandul Snake) आढळून आला. हा सर्प नागरिकांना दिसल्यावर दिलीप बडवर (Dilip Badwar) यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेला (Nature Conservation Society) याबाबत माहिती दिली…

- Advertisement -

वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष जयेश पाटील (Jayesh Patil) आणि सदस्य हेमंत कोलते (Hemant Kolte) हे त्वरित घटनास्थळी दाखल झाले. हा सर्प (Snake) साधारण चार फूट लांबीचा संपूर्ण वाढ झालेला मांडूळ सर्प असल्याची खात्री त्यांनी केली आणि त्यास सुरक्षित रित्या ताब्यात घेऊन वनविभागाकडे (Forest Department) सुपूर्द करण्यात आले.

Visual Story : अलविदा! फिरकीच्या जादुगाराला अखेरचा निरोप

मांडूळ हा सर्प दुतोंड्या साप म्हणून ओळखला जातो. गुप्त धन शोधणे, औषधी गुणधर्म अशा अनेक अंधश्रद्धांना बळी पडलेला या सापाची मोठ्या प्रमाणात तस्करी होऊ लागली. त्याचमुळे हा सर्प दुर्मिळ घोषित करण्यात आला.

शांत स्वभाव असल्यामुळे या सापाबाबत अंधश्रद्धा आणि तस्करीचे प्रमाण जास्त झाले होते . खरं तर या सापाला इतर सपांसारखे एकच बाजूने डोकं असते आणि शेपटीचा भाग फक्त डोक्यासारखा दिसतो.

Visual Story : मोस्ट अवेटेड ‘KGF Chapter 2’ चे गाणे ‘या’ दिवशी होणार रिलीज

या सापावर कुठल्याही नैसर्गिक शिकाऱ्याने हल्ला केला तर तोंडाचा बचाव होऊन शिकारी शेपटीवर हल्ला होतो आणि त्याचे प्राण वाचतात. वनविभाग (Forest Department) आणि पोलीस (Police) प्रशासनामुळे तस्करी बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे.

तरी असा सर्प कोठे दिसून आल्यास कोणतीही अंधश्रद्धा न बाळगता वनविभाग अथवा पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वन्यजीव संरक्षण संस्था ,नाशिक तर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या