Sunday, November 24, 2024
Homeभविष्यवेधडोळा - स्वभाव व व्यक्तिमत्वाची ओळख

डोळा – स्वभाव व व्यक्तिमत्वाची ओळख

तुमच्या डोळ्यात सर्वकाही दिसते, असे म्हटले जाते. आपल्या शरीराचा अभ्यास करण्याच्या काही पद्धती पुराणांमध्ये सांगण्यात आल्या आहेत. मानवी अवयवांच्या रचनेनुसार एखाद्या माणसाचा स्वभाव आणि त्याचे व्यक्तिमत्त्व जोखले जाऊ शकते. गरुड पुराणात असलेल्या समुद्रशास्त्रात याबाबत सांगण्यात आले आहे. अगदी वेदकाळापासून माणसाला ओळखण्यासाठी काही पद्धतींचा वापर केला जात आहे. यामध्ये डोळ्यांचाही समावेश असून, डोळे, डोळ्यांचा रंग, डोळ्यांचा आकार यावरून काही प्रमाणात एखाद्या व्यक्तीबाबत अंदाज बांधला जाऊ शकतो.

गुणवान- समुद्रशास्त्रात डोळ्यांचा आकार आणि डोळ्यांचा रंग या दोन गोष्टी वेगवेगळ्या विभागांत विभागण्यात आले आहेत. काळेभोर डोळे शुभ मानले जातात. काळ्या रंगाचे डोळे असलेल्या व्यक्ती गुणवान मानल्या जातात. माणसे जोडणे त्यांना आवडते आणि नातेसंबंधांमध्ये आपले 100 टक्के योगदान देण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. अशा व्यक्तींवर डोळे बंद करून विश्वास ठेवला जाऊ शकतो. काळ्या रंगाचे डोळे असलेल्या व्यक्ती प्रामाणिक आणि जबाबदार असतात.

- Advertisement -

समजूतदार- समुद्रशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींचे डोळे गोल असतात, अशा व्यक्ती खूप समजूतदार असतात, असे सांगितले जाते. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी त्या खंबीरपणे परिस्थितीला सामोरे जातात. त्या विचलित होत नाहीत. समस्या, अडचणींतून मार्ग काढतातच. डोळ्यांचा आकार गोल असणार्‍या व्यक्ती कधी कुणाचा विश्वासघात करीत नाहीत, असा दावा केला जातो. गोल डोळे असणार्‍या व्यक्ती कोणताही निर्णय विचारपूर्वक घेतात. केवळ वर्तमान नाही, तर भविष्याबाबतही विचार करून आपली कृती ठरवतात, असे सांगितले जाते.

दिलदार- समुद्रशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींच्या डोळ्यांचा आकार मोठा असतो, अशा व्यक्ती दिलदार आणि मोठ्या मनाच्या असतात. आपल्या नात्यांप्रति त्या प्रामाणिक असतात. कोणालाही मदत करण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात. सर्वांना मदत करून त्यांना समाधान मिळत असते. अनेकदा ते आपणाहून एखाद्याची मदत करायला पुढे सरसावतात. चांगले आणि वाईट यांच्यातील फरक ते योग्य पद्धतीने करतात. कोणत्याही शंकेशिवाय अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू शकतो, असे सांगितले जाते.

यांची गोष्टच निराळी – समुद्रशास्त्रात निळ्या रंगाचे डोळे आणि भुरकट डोळे असलेल्यांना वेगळ्या विभागात ठेवण्यात आले आहे. निळ्या रंगाचे डोळे असलेल्या व्यक्ती चलाख असतात. अशा व्यक्ती केवळ आपले हित पाहतात. एखाद्याला मदत केल्यामुळे स्वतःचे नुकसान होत असेल, तर त्यातून त्या बाजूला होतात. भुरकट डोळे असणार्‍या व्यक्ती केवळ स्वतःबद्दल विचार करतात. अशा व्यक्तींवर विश्वास ठेवताना बुद्धी आणि विवेक यांचा योग्य वापर करणे हितकारक ठरू शकते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या