नवी दिल्ली- देशभरात टोल नाक्यावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने फास्टॅग नावाची वाहनांसाठी इलेक्ट्रिक चीप आणली आहे. या चीपमुळे वेळेची बचत तसेच इंधनाची बचत होणार असल्याचे सांगितले आहे.
राष्ट्रीय महामार्गांवर इलेक्ट्रॉनिक टोल सुरू केल्यानंतर आतापर्यंत तब्बल 1 कोटी 10 लाख फास्टॅग वितरीत करण्यात आले आहेत. तसेच दररोज दीड ते दोन लाख फास्टॅगची विक्री होईल, अशी अपेक्षा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून व्यक्त करण्यात येत आहे. नव्या डिजिटल व्यवस्थेला जनता स्वीकारत आहे, याचं हे उदाहरण असल्याचे एका अधिकार्याने सांगितले आहे.
याचाच परिणाम टोल वसुलीवर झाला असून दररोज होणारी टोल वसूली 46 कोटी रूपयांवर पोहोचली असल्याची माहिती अधिकार्यांकडून देण्यात आली आहे.
फास्टॅगद्वारे टोल वसूली सुरू केल्यानंतर फास्टॅगद्वारे टोल वसूली दररोज 24 लाखांपर्यंत पोहोचली आहे. तसेच याद्वारे टोल भरण्यामध्ये प्रवाशांना येणार्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे.