Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशलॉकडाऊन काळात सर्वात मोठी गुंतवणूक; फेसबुककडून जिओचे ९.९९ टक्के शेअर्स खरेदी

लॉकडाऊन काळात सर्वात मोठी गुंतवणूक; फेसबुककडून जिओचे ९.९९ टक्के शेअर्स खरेदी

मुंबई : जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या फेसबुकने आज जिओ मध्ये 9.99 टक्के हिस्सेदारी घेण्याची घोषणा केली आहे.

यामुळे ऐन लॉकडाऊन च्या काळात आतापर्यंत ही सर्वात मोठी बोलणी असून यातून जिओला जवळपास 43 हजार 574 कोटी रुपये मिळणार आहेत.

- Advertisement -

आज जाहीर करण्यात आलेल्या एका वक्तव्यात फेसबुकने याबाबतची माहिती दिली. यामुळे फेसबुक ही जिओ कंपनीची सर्वात मोठी शेअर होल्डर कंपनी झाली आहे.

भारतात जिओ ने ऑनलाईन क्रांती घडवून आणली आहे. यामध्ये जिओ ने जवळपास 38 कोटी युजर्सला ऑनलाईन आणले आहे. यामुळे फेसबुक वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे.

अजुनही जिओसोबत जाऊन आणखी युजर्स येणाऱ्या काळात वाढतील अशी आशाही फेसबुक ने व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या