Monday, September 16, 2024
Homeमनोरंजनलतादीदींच्या अंत्यदर्शनावेळी शाहरुखनं नेमकं काय केले ज्याने तो एवढा ट्रोल होतोय?, नेमकं...

लतादीदींच्या अंत्यदर्शनावेळी शाहरुखनं नेमकं काय केले ज्याने तो एवढा ट्रोल होतोय?, नेमकं सत्य काय?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं रविवारी सकाळी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे अवघा देश शोकाकुल झाला. त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन (lata Mangeshkar funeral) घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (narendra modi) ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत (Uddhav Thackeray) अनेक दिग्गज आले होते. तसंच सिनेसृष्टीतील शाहरुख खान (SHAH RUKH KHAN), आमिर खान (Amir Khan), जावेद अख्तर (Javed Akhatar) यांच्यासह इतर मान्यवरही आले होते.

शाहरूख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) दोघे एकत्र लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले होते. यावेळी पूजा ददलानी तेथे हात जोडून उभी होती. तर शाहरूख खान तेथे उभा राहून दुवा पठण करीत होता. यानंतर त्याने आपला मास्क खाली घेतला आणि खाली वाकून पार्थिवावर फूंकर मारली. यानंतर शाहरूख हात जोडून पार्थिवाची परिक्रमा करून पूजासोबत खाली उतरला.

Lata Mangeshkar : लता दीदींना जेवणातून दिलं गेलं विष, तीन महिने सुरु होते उपचार

शाहरूखच्या या पद्धतीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. फूंक मारण्याला काही लोक थुंकल्याचं मानत आहेत. अनेकांनी यावर स्पष्टीकरण दिलं की, हजारो लोकांच्या उपस्थितीत एका दिग्गज व्यक्तीच्या पार्थिवावर थुंकू कसं शकतं? त्यांनी दुवा पठण केल्यानंतर फूक मारली असं अनेकांनी सांगितलं. मात्र तरीही त्यांना सार्वजनिक ठिकाणी असं काही करण्यापूर्वी विचार करायला हवा होता असं काहींचं म्हणणं आहे.

शाहरुख खानच्या या व्हिडिओवरून सोशल मिडियावर (Social media) वाद सुरू झाला आहे. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र ही प्रक्रिया म्हणजे थुंकनं नसून, दुआ केल्यानंतर मारलेली फुंकर असल्याचं समजतंय. इस्लाम धर्मात दुआ करताना अशा पद्धतीने फुंकर मारली जात असल्याचं इस्लाम धर्मातील तज्ञ सांगतात.

Nora Fatehi Birthday : कधी ‘वेटर’ तर ‘अडीनडी’ला लॉटरी विकण्याचं केलं काम, कसा आहे अभिनेत्री नोरा फतेहीचा प्रवास? जाणून घ्या…

इस्लामची माहिती असणाऱ्या अनेकांनी शाहरुख थुंकल्याचा हा दावा खोडून काढत शाहरुखने मास्क खाली घेऊन पार्थिवाकडे पाहून फुंकर मारल्याचं म्हटलं. एखाद्या व्यक्तीला अखेरचा निरोप देताना त्याच्या पार्थिवावर फुंकर मारल्यास पार्थिवासोबतच्या नकारात्मक शक्ती दूर लोटल्या जातात असा समज आहे. त्यामुळेच इस्लाम रिवाजानुसार मृत व्यक्तीच्या पार्थिवावर फुंकर मारली जाते.

दरम्यान, शाहरुखला ट्रोल केलं जात असल्याने शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) प्रचंड संतापले आहेत. शाहरुख खान दुवा मागत होता. त्याला ट्रोल केलं जातंय. हा काय प्रकार आहे. हा निव्वळ नालायक आणि बेशरमपणा आहे. एका गटाकडून, परिवाराकडून शाहरुखला ट्रोल केलं जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. राऊत यांनी टीका करताना कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांनी एका परिवाराकडून शाहरुखला ट्रोल केलं जात आहे, असं सांगून संशयाची सुई भाजपच्या दिशेने वळवली आहे. त्यामुळे राऊत यांच्या या टीकेवरून वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच भाजप त्यावर काय प्रतिक्रिया देतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Lata Mangeshkar : जेव्हा बाळासाहेब लता दिदींना म्हणाले, राजकारणात येता का?

- Advertisment -

ताज्या बातम्या