मुंबई । Mumbai
सोशल मीडियावर एखादी पोस्ट कधी व्हायरल (Viral Video) होईल याचा काही नेम नाही. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रवाशांनी भरलेली बोट खोल पाण्यात बुडाली अन् एका क्षणात होत्याच नव्हतं झालं. हा व्हिडीओ गोव्यातील (Goa Viral Video Fact Check) असल्याचा नेटकऱ्यांचा दावा आहे. पण हा व्हिडीओ गोव्यातील नसल्याचं समोर आलं आहे.
काय होत आहे व्हायरल?
समुद्रात बोट बुडण्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ गोव्यातील असून, यात २३ लोक मृत्यूमुखी पडले असून, ४० जणांना वाचविण्यात आले आहे. तर, ६४ जण बेपत्ता असल्याचा दावा करण्यात आला आहे. क्षमतेपेक्षा जास्त लोक बोटमध्ये बसल्याने हा अपघात झाल्याचे देखील या व्हिडिओत म्हटले आहे.
व्हिडिओत काय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक अथांग असा समुद्र दिसून येत आहे. या समुद्रात दोन नवका दिसत आहे. एका नवकामधून एक व्यक्ती संपूर्ण घटना कैद करत आहे तर दुसरीकडे एक मध्यम आकाराची बोट दिसून येत आहे. व्हिडिओ तुम्ही पुढे पाहिले तर जी समुद्रात अनेक व्यक्तींनी भरलेली बोट दिसतेय ती पाण्यातून येत आहे. मात्र पाहता पाहता बोट संपूर्ण पाण्यात पडून त्यामधील संपूर्ण नागरिक पाण्यात सामावले जातात. मात्र समोरच्या बोटवरील व्यक्तींनी घटना कॅमेऱ्यात कैद केलेली आहे. काही समजण्याच्या आधीच संपूर्ण व्यक्तींनी भरलेली बोट पाण्यात पडते.
सत्य काय?
अशा प्रकारची गोव्यात घडली नसल्याची माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तसंस्थेने यासंबधित एक वृत्त प्रसिद्ध केले असून, व्हिडिओ संबधित घटना आफ्रिका खंडातील कांगो येथील असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. एका वृत्तसंस्थेने २ ऑक्टोबर रोजी यासंबधित वृत्त प्रसिद्ध केले आहे. यात गव्हर्नरने दिलेल्या माहितीनुसार, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील किवू सरोवरात गुरुवारी २७८ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली. यात ७८ लोकांचा बुडून मृत्यू झाला.