Friday, October 11, 2024
Homeनगर48 तासांत कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू करा, अन्यथा वेगळा विचार

48 तासांत कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू करा, अन्यथा वेगळा विचार

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर) –

येत्या अठ्ठेचाळीस तासांत काय करायचे ते करून कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू करा. अन्यथा दोन दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन कारखान्याबाबत

- Advertisement -

निर्णय घेऊन वेगळा विचार करू, असा सज्जड इशारा डॉ. बा.बा.तनपुरे साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक खासदार डॉ.सुजय विखे यांनी कामगारांना दिला आहे.

दोन महिन्यांपूर्वी कारखाना सुरू झाला. मात्र, वारांवर बिघाड होत आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी यांची तातडीने बैठक घेऊन विखे यांनी हा इशारा दिला.

यावेळी डॉ. विखे म्हणाले, कारखाना सुरू असताना नैसर्गिकरित्या काही बिघाड झाला तर काही हरकत नाही. मात्र, मानवनिर्मित अडथळे कदापी सहन केले जाणार नाही. संचालक मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकर्‍यांनी आपल्याकडे उसाची नोंद देऊन ऊस देण्याची तयारी दर्शविली आहे. दोन महिने त्यांनी वाट पाहिली आहे. जानेवारीतही कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार नसेल तर शेतकरी सभासदांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा वेळीच निर्णय घ्यावा लागेल, असे डॉ.खासदार सुजय विखे यांनी म्हटले आहे.

दरम्यान नोव्हेंबर महिन्यात कारखाना सुरू झाल्यावर अगोदर बॉयलर, नंतर टर्बाईनचा अडथळा निर्माण झाला. सध्याही कारखाना बंद आहे. हा कारखाना सुरू राहिला तरच कामगारांची चूल पेटणार असल्याने कामगार कधीही हलगर्जीपणा करणार नाहीत, असे कामगारांचे म्हणणे आहे. तर सध्या झालेला बिघाड हा अकुशल कामगारांचा परिपाक असल्याची चर्चा आहे. या बैठकीसाठी कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे, व्हा.चेअरमन दत्तात्रय ढूस, सर्व संचालक, प्रभारी कार्यकारी संचालक भाऊसाहेब सरोदे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या