औरंगाबाद –
एकनाथ खडसे यांनी आपल्याला व्हिलन ठरविले, योग्य वेळी यावर बोलणार असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला, हे
दुर्दैवी आहे. त्यांनी राजीनामा द्यायला नको होता. माझ्याबाबत तक्रारी असतील तर त्यांनी वरिष्ठांकडे जायला पाहिजे होते, असेही ते म्हणाले.
याचबरोबर, एकनाथ खडसे अर्धसत्य सांगत आहेत. मला त्यावर बोलायचे नाही. अशा परिस्थितीत कुणाला तरी व्हिलन ठरवायचे आहे. त्यांनी मला ठरवले. मला त्यावर काहीही बोलायचे नाही, भाजपा हा मोठा पक्ष, कुणाच्या जाण्याने किंवा येण्याने पक्ष थांबत नाही. जळगाव जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तेथील जनता भाजपासोबतच आहे, खडसे यांनी राष्ट्रवादीच जाण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांच्यासोबत भाजपचा एकही आमदार जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळून लावली. असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांनी भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले.
मी फक्त देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहे. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.