Wednesday, February 4, 2026
HomeराजकीयDevendra Fadnavis : महानगरपालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली, फडणवीसांचा ठाकरे गटाला टोला

Devendra Fadnavis : महानगरपालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली, फडणवीसांचा ठाकरे गटाला टोला

मुंबई । Mumbai

मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. पारंपरिक उत्साह, थरार आणि उत्सवाच्या रंगात संपूर्ण महाराष्ट्र रंगला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी दहीहंडी आयोजकांनी विविध कलाकार, अभिनेते आणि नेत्यांना निमंत्रित केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अनेक दहीहंडी ठिकाणी भेट दिली.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी सर्वप्रथम वरळी येथील जांबोरी मैदानात आयोजित परिवर्तन दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी व्यासपीठावरून कोणतेही राजकीय भाष्य न करता उपस्थितांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, नंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

YouTube video player

फडणवीस म्हणाले, “महानगरपालिकेत परिवर्तन अटळ आहे. आम्ही महापालिकेतील पापाची हंडी फोडली असून आता विकासाची हंडी लावली जाईल. त्या विकासाच्या हंडीतले लोणी आम्ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणार आहोत.”

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरून त्यांनी विरोधकांना चिमटा काढला. पत्रकारांनी विचारले की, इतक्या वर्षे ते लोणी कुठे जात होते? यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “कुठे जात होते ते तुम्हालाच माहीत आहे. माझ्या तोंडून काढून घेऊ नका. लोणी कोणी खाल्ले हे जनतेला चांगले ठाऊक आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

यावेळी त्यांनी राज्यातील उत्सवांवरील बंधनांचा विषयही उपस्थित केला. ते म्हणाले, “दहीहंडी आणि गणेशोत्सवावर यापूर्वी अनेक बंधने होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमच्या सरकारने ती सर्व बंधने हटवली आहेत. त्यामुळे आज प्रचंड उत्साहात दहीहंडी साजरी होत आहे.”

मुख्यमंत्री फडणवीस यांनी हवामानाबाबत बोलताना सांगितले की, रात्रीपासून पाऊस सुरू आहे आणि पुढील काही तासांतही पावसाची शक्यता आहे. तरीदेखील गोविंदांचा उत्साह हा पावसाच्या सरींपेक्षा अधिक मोठा आहे. “पाऊस कितीही आला तरी उत्साह कमी होणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यांनंतर राजकीय वातावरणात नव्या चर्चांना ऊत आला आहे. विशेषतः महापालिकेतील “पापाची हंडी” या विधानावरून ठाकरे गटाकडून आता काय प्रतिक्रिया दिली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक उत्साहाबरोबरच राजकीय संदेश देण्याचे कामही होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जनतेसोबत जल्लोषात सहभागी होताना राजकीय टीकाही केली जात असल्याने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हे संकेत महत्त्वाचे मानले जात आहेत.

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...