जळगाव । प्रतिनिधी
जळगाव ग्रामीणमधील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बांभोरी (प्र.चा.) येथील शेकडो तरूणांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी मंत्री श्री.देवकर यांनी त्यांचे स्वागत केले. महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना जळगाव ग्रामीणमधील प्रचार रॅलीत प्रतिसाद मिळत आहे.
अनेक ठिकाणी तरूण पक्ष प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसचे हात बळकट करत आहेत. बांभोरी येथील तरूणांनीही राष्ट्रवादीत प्रवेश करून माजी मंत्री श्री.देवकर यांना साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी मजूर फेडरेशनचे माजी सभापती लीलाधर तायडे, जळगाव कृऊबासचे संचालक दिलीप पाटील, राष्ट्रवादीचे धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी, जिल्हा सरचिटणीस बरकत अली आदी उपस्थित होते.
यांनी केला प्रवेश- मनोज पाटील, लीलाधर तायडे, योगेश नन्नवरे, चंदू नन्नवरे, राहूल सपकाळे, संदीप कोळी, विठ्ठल नन्नवरे, राकेश कोळी, देवेंद्र नन्नवरे, मोहन कोळी, किरण सपकाळे, गौरव कोळी, पवन कोळी, नीलेश साळुंखे, नामदेव सपकाळे, महेंद्र सपकाळे, निखिल कोळी, सचिन नन्नवरे, पांडुरंग सपकाळे, गौरव ठाकरे, हेमंत सपकाळे, जगदीश सपकाळे, ज्ञानेश्वर सपकाळे, किशोर सपकाळे, दिनेश सपकाळे, नामदेव नन्नवरे, पद्माकर नन्नवरे, मच्छिंद्र नन्नवरे, समाधान सोनवणे, किशोर सोनवणे, कुणाल सपकाळे, अमोल नन्नवरे, मुरलीधर सपकाळे, जितेंद्र साळुंखे, संजय नन्नवरे, नितीन नन्नवरे, विलास नन्नवरे, रवींद्र नन्नवरे, नीलेश नन्नवरे, गजानन नन्नवरे, कृष्णा नन्नवरे, विनायक नन्नवरे, तुषार नन्नवरे, संदीप नन्नवरे, रामू नन्नवरे, युवराज नन्नवरे, किरण बाविस्कर, रामचंद्र सपकाळे, समाधान सपकाळे, भीमराव सपकाळे, राहुल नन्नवरे, विनायक शहादू नन्नवरे, ज्ञानेश्वर नन्नवरे, विकास नन्नवरे, सागर नन्नवरे, राहुल सोनवणे, संदीप बाविस्कर, सचिन सोनवणे, गोकूळ सोनवणे, जितेंद्र साळुंखे, गजानन नन्नवरे, राजेंद्र कोळी, अरूण नन्नवरे, कृष्णा सपकाळे, सोनू सपकाळे, गणेश सोनवणे, आनंदा सोनवणे, विजय सोनवणे, महेश सोनवणे, विजय साळुंखे, सुरेश रायसिंग, किरण सोनवणे, दिलीप सोनवणे, योगेश सोनवणे, ज्ञानेश्वर बाविस्कर, विजय बाविस्कर, गमेश सूर्यवंशी, दीपक सूर्यवंशी, प्रभाकर पाटील, राहुल बाविस्कर, आण्णा बाविस्कर, कुणाल कंरकर, डिगंबर सोनवणे, वसंत सोनवणे, मनोज कोळी, सुकदेव नन्नवरे, चावदस सोनवणे, चंद्रभान कोळी, किरण बाविस्कर, वासुदेव कोळी.