Monday, May 27, 2024
Homeनगरखोटे जात प्रमाणपत्र दाखल केल्याने दोघा भावांना अटक

खोटे जात प्रमाणपत्र दाखल केल्याने दोघा भावांना अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जातीचा खोटा दाखला तयार करून तो सादर केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात दोघा सख्ख्या भावांना अटक करण्यात आली आहे. अभिषेक बिनय गुप्ता (वय 26) व अभिनव बिनय गुप्ता (वय 27 दोघे मूळ रा. बिहार, हल्ली रा. जनता बाजार, दत्त चौक सिडको, नाशिक) अशी अटक केलेल्या दोघा भावांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची (21 जुलैपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

जातीचा खोटा दाखला तयार करून तो सादर केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात मार्चमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरूवातीला अभिषेक बिनय गुप्ता व त्याला मदत करणारा सुनील पाटील (रा. सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक) यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास सहा. निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहेत. तपासादरम्यान अभिनव गुप्ता याचे नाव समोर आहे. अभिषेक व अभिनव या दोघांना अटक केली असून सुनील पाटील पसार आहे.

अभिषेक गुप्ता हा नाशिक येथे वास्तव्यास असून, तो सध्या मुंबई येथील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याने नाशिक येथील जात पडताळणी समितीकडे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी दावा दाखल केला होता. तो समितीने फेटाळला होता. त्यानंतर त्याने नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एकरूखे येथील तेली समाजातील रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीला सादर केले होते. ते तयार करण्यासाठी त्याला सुनील पाटील याने मदत केली.

समितीने याबाबत तपासणी करण्याचा आदेश दक्षता पथकाला दिला होता. जातपडताळणी समितीच्या दक्षता पथकाचे पोलीस निरीक्षक सईदखाँ दादाखाँ पठाण (रा. सुर्यानगर, नगर-छत्रपती संभाजीनगर रोड) यांनी चौकशी करून पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली असून तिसर्‍याचा शोध सुरू आहे. निरीक्षक रणदिवे अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या