Thursday, October 1, 2026
HomeनगरPathardi : बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी पाथर्डीतील शिक्षकाला अटक

Pathardi : बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी पाथर्डीतील शिक्षकाला अटक

आतापर्यंत चार आरोपी जेरबंद || शैक्षणिक वर्तुळात खळबळ

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी सोलापूर पोलिसांनी पाथर्डीतील शिक्षक विजय गर्जे यांना अटक केल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. गर्जे हे बीड जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून पाथर्डी शहरात वास्तव्यास आहेत. पाटबंधारे विभागातील कनिष्ठ लिपिक राजेश जाधव यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात अर्ज केला होता. मात्र, शारीरिक तपासणीत अपात्र ठरल्याने प्रमाणपत्र नाकारण्यात आले. त्यानंतर जाधव यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र मिळविले. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बनावट आधारकार्ड तयार करून देण्यास विजय गर्जे यांनी मदत केल्याचा आरोप आहे.

- Advertisement -

दिव्यांग संघटनेच्या तक्रारीनंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली. समितीच्या चौकशीत जाधव दोषी आढळून आला असून, गर्जे यांच्यासह आणखी चार जणांनी त्याला मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आतापर्यंत गर्जे यांच्यासह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोलापूर पोलिसांनी गर्जे व इतर आरोपींना सोलापूर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सुरुवातीला गर्जे यांना 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलीआहे.

ताज्या बातम्या

Maharashtra News : परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल; काँग्रेस प्रभारी डॉ. सिरिवेल्ला...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai देशाची लोकशाही आणि संविधान संपवण्याची प्रक्रिया सुरु आहे. भाजपने निवडणूक आयोगाला स्वतःचे एजंट बनवले असून देशात चोरांचे राज्य आहे. मतचोरी,...