Sunday, November 10, 2024
Homeनगरनगरकरांनो तूप घेताना सावधान! बाजारात भेसळयुक्त तुपाची विक्री

नगरकरांनो तूप घेताना सावधान! बाजारात भेसळयुक्त तुपाची विक्री

अहमदनगर | प्रतिनिधी

सणासुदीच्या काळात नगरमध्ये भेसळयुक्त तुपाचा पुरवठा होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. नगर शहरातील दोन दुकानात केलेल्या तपासणीतून अन्न व औषध प्रशासनाने भेसळीच्या संशयावरून सुमारे 10 लाख रूपये किंमतीचे तूप जप्त केले होते.

- Advertisement -

त्या तुपाचे नमूने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यातील एका दुकानातील तूपात भेसळ असल्याचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. दरम्यान, संबंधीतांना नोटीस देण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

गणेशोत्सवासह आगामी सण- उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर भंडारा किंवा प्रसादासाठी वापरल्या जाणार्‍या पदार्थांत भेसळ होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासन सज्ज झाले आहे. त्यांच्याकडून नगर शहरासह जिल्ह्यातील दुकानांची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. खवा, मिठाई, पनीर, दही, तूप, खाद्य तेल, फरसाण, रवा, आटा, बेसन, मैदा, सुकामेवा आदी पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहित राबविण्यात येत आहे.

हे ही वाचा : आई-वडिलांच्या डोळ्यादेखत बिबट्याचा मुलावर हल्ला; गंभीर जखमी मुलाचा मृत्यू

दरम्यान, केडगाव उपनगरातील गुरूदत्त मार्केट व दाळमंडई येथील कटारीया ट्रेडर्स या दुकानात भेसळयुक्त तूप विक्रीसाठी ठेवले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यांनी त्या दुकानात छापे टाकून भेसळीच्या संशायावरून दोन्ही ठिकाणचे मिळून सुमारे 10 लाखाचे तूप जप्त केले होते.

सदरची कारवाई 15 दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्या तुपाचे नमूने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाला आहे. यामध्ये गुरूदत्त मार्केट येथे पकडलेल्या सुमारे साडेतीन लाख रूपयांच्या तुपात भेसळ आढळून आल्याचा हा अहवाल असून दाळमंडईतील कटारिया ट्रेडर्समधील दुकानातील तुपाचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. मात्र हे तूप देखील भेसळयुक्त असावे, असा संशय अन्न व औषध प्रशासनाने व्यक्त केला आहे.

हे ही वाचा :  संतापजनक! दिवसाढवळ्या फूटपाथवर महिलेवर अत्याचार होत होता अन् लोक…

गुजरात, मध्यप्रदेशमधून पुरवठा

नगर शहरातील दुकानात विक्री होत असलेले भेसळयुक्त तूप गुजरात व मध्यप्रदेश राज्यातून येत असल्याचे तपासणीतून समोर आले आहे. कमी किंमतीमध्ये तूप मिळत असल्याने त्याला मोठ्या प्रमाणात मागणी होती. मात्र हे भेसळयुक्त तूप विक्री करून येथील दुकानदार नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा प्रकार ऐन सणासुदीच्या काळात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या