Thursday, May 22, 2025
Homeनगरबनावट लिंक केली ओपन अन् खात्यातून गेले 50 हजार

बनावट लिंक केली ओपन अन् खात्यातून गेले 50 हजार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

एका व्यावसायिकाला मोबाईलवर मेसेजव्दारे आलेली बनावट लिंक त्याने ओपन करून त्यावर ओटीपी टाकला असता त्यांच्या खात्यातून 49 हजार 900 रुपये कट होऊन त्यांची फसवणूक झाली आहे. ही घटना बुधवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यावसायिक वैभव संजय टेमक (वय 26 रा. कवेडनगर, बालिकाश्रम रोड, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र बालिकाश्रम रोडवरील कवडेनगरमध्ये भाडोत्री रूम घेऊन राहतात. त्यांची द्रोपदी इंजिनियरींग फॅब्रिकेशन वर्क्स नावाची कंपनी आहे. वैभव टेमक यांचे एच.डी.एफ.सी बँकेत खाते आहे. त्यांना बुधवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर टेक्स मेसेजव्दारे एक लिंक आली.

फिर्यादीने ती लिंक ओपन केली असता त्यांना एक ओटीपी विचारला गेला. त्यांनी तो ओटीपी लिंकवर भरला असता त्यानंतर लगेचच फिर्यादीच्या बँक खात्यातून 49 हजार 900 रुपये कट झाल्याचा मेसेज त्यांना आला. त्यानंतर फिर्यादीने एच.डी.एफ.सी बँकेच्या कॉल सेंटरला फोन करून बँक खाते ब्लॉक करण्यास सांगितले. त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सोमनाथ घार्गे अहिल्यानगरचे नवे पोलीस अधीक्षक; राकेश ओला यांची...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अडीच वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले राकेश ओला (SP Rakesh Ola) यांची बदली (Transfer) बृहन्मुंबई (Mumbai) येथे...