धुळे । प्रतिनिधी । Dhule
शहरातील साक्री रोडवरील यशवंत नगरमागील राजीव गांधी नगरातील बनावट दारूचा कारखाना शहर पोलिसांनी छापा टाकत उद्ध्वस्त केला. घटनास्थळाहून स्पिरीटसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी धनराज शिरसाठसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे हे शोधपथकासह आज दि. 1 रोजी यशवंत नगर परिसरात पेट्रोलिंग करित होते. त्यादरम्यान यशवंत नगरमागे राजीव गांधीनगर मधील सार्वजनिक शौचालयाजवळ नाल्याच्या किनारी धनराज शिरसाठ (रा.भिमनगर) हा त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने बनावट दारू बनविण्याचा कारखाना चालवित असल्याची गोपनिय पीआय कोकरे यांना मिळाली. त्यां
नी तात्काळ दुपारी साडेतीन वाजता तेथे छापा टाकला. एक पत्र्याच्या खोलीमध्ये बाटल्यांचा आवाज येत असल्याने दरवाजा उघडला असता तेथील ऋतीक मोरे, सोनु पवार, आकाश आहिरे हे पत्र्याच्या खोलीच्या मागील दरवाजाने पळुन गेले. या ठिकाणी दारुच्या भरलेल्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या, बाटलीचे बुच, दारू बनविण्यासाठी लागणारे रसायन, स्पिरीट, दोन मोटारसायकल व इतर साहित्य असे एकुण 2 लाख 93 हजार 970 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी धनराज शिरसाठ ऋतीक मोरे, सोनु पवार, आकाश आहिरे यांच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोसई दत्तात्रय उजे करित आहेत.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे व सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा विभागीय पोलीस अधिकारी ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आंनद कोकरे, सपोनि दादासाहेब पाटील, पोसई डी.बी.उजे, हवालदार मच्छिंद्र पाटील, पोना कुंदन पटाईत, प्रल्हाद वाघ, पोकॉ निलेश पोतदार, प्रविण पाटील, महेश मोरे, तुषार मोरे, मनिष सोनगिरे, गुणवंतराव पाटील, अविनाश कराड, शाकीर शेख चालक किरण भदाणे, शाहीद शेख यांनी केली आहे.