Saturday, February 15, 2025
Homeनंदुरबारशहाद्यात बनावट पिस्तोल जप्त

शहाद्यात बनावट पिस्तोल जप्त

शहादा । Shahada। ता.प्र.-

शहादा शहरातील मोहिदा चौफुलीवर रस्त्यावर लोखंडी बनावटीची पिस्तोल (Fake pistol) व 2 जिवंत काडतुस (Cartridge) बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी (police) एकास ताब्यात (possession) घेतले आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा शहरातील मोहिदा चौफुलीवर रस्त्याच्या बाजुला सार्वजनिक जागी शेमळे प्रल्हाद वेडु हा त्याच्या ताब्यात विना परवाना मानवी जिवीतास घातक असलेली 35 हजार रुपये किमतीची गावठी बनावटीची लोखंडी सिल्वर रंगाची पिस्तोल कब्जात बाळगतांना आढळून आला.

तसेच 400 रुपये किमतीचे 2 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोशि दिनकर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शेमळे प्रल्हाद वेडु (रा.हनुमान मंदीर जवळ कुकडेल शहादा) याच्याविरुद्ध भारतीय हत्यार का क 3 चे उल्लंघन 25 प्रमाणे शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पुढील तपास पोह मेहेरसिंग वळवी करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या