Saturday, August 29, 2026
Homeक्राईमCrime News : तोतया पोलिसाने दीड लाखाची चैन लांबवली

Crime News : तोतया पोलिसाने दीड लाखाची चैन लांबवली

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

शहरात तोतया पोलिसांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून पोलीस असल्याचे भासवून लुटमार करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेंडी परिसरात एका महाविद्यालयीन तरुणाला पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात भामट्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साहिल भंडारे (रा. भिस्तबाग चौक, सावेडी) हा तरुण 12 डिसेंबर रोजी दुपारी वांबोरी रोडवरील मल्हारगडाच्या पायथ्याशी असताना एका विना नंबरच्या लाल-काळ्या पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या व्यक्तीने त्याला अडवले. मी पोलीस आहे, असे सांगून त्याने तरुणाला शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. दहशतीखाली आलेल्या तरुणाच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन काढून घेऊन तो भामटा वेगाने पसार झाला. या घटनेनंतर तरुण प्रचंड घाबरल्याने त्याने सुरुवातीला कोणालाही काही सांगितले नाही.

मात्र, वडिलांनी चैनबाबत विचारणा केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. पोलिसांनी या प्रकरणी 19 डिसेंबर रोजी चोरी आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून, नागरिकांनी अशा तोतया लोकांपासून सावध राहावे आणि ओळखपत्राची खात्री करावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २९ ऑगस्ट २०२६ – लोकशाहीत मतस्वातंत्र्य अन् विचारांची सीमारेषा

0
न्यूयॉर्कचे महापौर झोरान ममदानी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील नियोजित कार्यक्रमासंदर्भात घेतलेली भूमिका आणि त्यावर उमटलेले राजकीय तसेच सामाजिक पडसाद...