Sunday, September 29, 2024
Homeधुळेपारोळ्यातील तोतया पोलिस धुळ्यात गजाआड

पारोळ्यातील तोतया पोलिस धुळ्यात गजाआड

धुळे । Dhule । प्रतिनिधी

शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासह विविध ठिकाणी पोलिस असल्याची बतावणी करीत प्रवाशांचे दागिने लुटणार्‍या पारोळ्यातील तोतया पोलिसाला शहर पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून पाच ग्रॅमचे सोन्याचे टोंगल हस्तगत करण्यात आले.

- Advertisement -

धुळे तालुक्यातील सोनगीर येथील शेतकरी गोविंदा बळीराम माळी (वय 60) हे मुलीकडे नाशिकला गेले होते. त्यांना शेतीसाठी पैशांची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी मुलीकडून सोन्याचे दगिने मागून घेतले. त्यानंतर ते धुळे बसस्थानकात आले. यावेळी एकाने त्यांना पोलिस असल्यची बतावणी करीत पोलिसाचे बनावट ओळखपत्र दाखविले. तसेच त्यांच्याकडून दागिने मागून घेतले. त्यानंतर तो दागिने घेवून पसार झाला. याबाबत शनिवारी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी शोध पथकाला सूचना दिल्या.

पथकाने बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याआधारे पोलिसांनी भिकन पंडीत शर्मा (वय 56 रा.तलावगल्ली, ता. पारोळा, जि.जळगाव) या ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल जप्त करण्यात आले आहे. वेगवान तपासाबद्दल पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी निरीक्षक कोकरेंसह त्यांच्या पथकाचे पत्रकार परिषदेत कौतुक केले. तर चोरीचा ऐवज परत मिळणार असल्याने शेतकरी माळी व त्यांच्या मुलीचे डोळे पाणावले होते.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस.ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे, पोसई प्रशांत राठोड, शोध पथकाचे अंमलदार पोहेकॉ मच्छिंद्र पाटील, पोकॉ प्रसाद वाघ, निलेश पोतदार, गुणवंतराव पाटील, असई ज्ञानेश्वर साळुंखे, पोना वैभव वाडीले, पोना विशाल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या