Friday, August 28, 2026
Homeनगरतोतया पोलिसांकडून वृध्दाची फसवणूक; 55 हजारांचा ऐवज लंपास

तोतया पोलिसांकडून वृध्दाची फसवणूक; 55 हजारांचा ऐवज लंपास

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सावेडी येथील जॉगिंग पार्कजवळ उभ्या असलेल्या एका वृध्दाला दोन अनोळखी इसमांनी पोलीस असल्याचे भासवून 55 हजार रूपये किमतीच्या दोन तोळ्याच्या सोन्याच्या व तांब्याच्या अंगठ्या लंपास केल्या. ही घटना शनिवारी (9 ऑगस्ट) सकाळी 11.50 ते 12 वाजण्याच्या सुमारास घडली असून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र नारायण राजहंस (वय 74 रा. अशोक नगर, भिंगारदिवे मळा, सावेडी) असे फसवणूक झालेल्या वृध्दाचे नाव असून त्यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

ते जाँगिग पार्क जवळ दुचाकीवर थांबलेले असताना, डोक्यावर हेल्मेट घातलेला एक इसम दुचाकीवरून आणि दुसरा पायी येऊन त्यांच्या जवळ आले. त्यांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगून सक्सेना नावाच्या व्यक्तीचा पत्ता विचारला. त्यापैकी एकाने पोलिसांचे ओळखपत्र दाखवून राजहंस यांचा विश्वास संपादन केला. यावेळी त्यांनी राजहंस यांच्या खिशातील मोबाईल व सुट्ट्या पैशांसह हातातील दोन तोळ्याच्या सोन्याच्या व दोन तांब्याच्या अंगठ्या तात्पुरत्या सुरक्षित ठेवण्यासाठी पिशवीत ठेवले असल्याचे भासवले. मात्र प्रत्यक्षात त्यांनी पिशवीत ठेवण्याऐवजी सोन्याच्या दोन व तांब्याच्या दोन अंगठ्या घेऊन पोबारा केला. घटनेनंतर राजहंस यांनी तोफखाना पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दहा वर्षांच्या अटीमुळे निवडणुकीतून बाहेर पडलेल्यांना संधी?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सहकार संस्था निवडणूक नियम 2014 च्या 10 मधील...