Friday, May 24, 2024
Homeनगरअशोक लेलँडला बनावट आरटीओ नंबर लावणारे श्रीरामपूर पोलिसांच्या ताब्यात

अशोक लेलँडला बनावट आरटीओ नंबर लावणारे श्रीरामपूर पोलिसांच्या ताब्यात

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील आरटीओ कार्यालयांमध्ये (RTO Office) अशोक लेलँड कंपनीच्या (Ashok Leyland Company) वाहनाला बनावट रजिस्ट्रेशन नंबर (Fake registration number to the vehicle) एमएच-17 बीडी 2178 हा लावून हा बनावट नंबर आरटीओ कार्यालयाकडून (RTO Office) पासिंग करण्याचा प्रयत्न केला. म्हणून दोन आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर (Shrirampur) येथील परिवहन कार्यालयात (Transportation office) एमएच 17 बीडी 2178 या नंबरच्या अशोक लेलंड कंपनीच्या वाहनाला बनावट रजिस्ट्रेशन करुन बनावट नंबर देवून पासिंग करण्याचा प्रयत्न झाला. तसेच बनावट दस्ताऐवज असल्याबाबतचा संशय आल्याने पोलिसांनी सदरची गाडी ही पोलीस ठाण्यात जमा करुन या गाडीचे कागदपत्रे संशयास्पद असल्याचे पोलीस अधिकार्‍यांना कळाले. त्यानुसार त्यांनी ओरीजनल कागदपत्रांची मागणी केली असता ती न दिल्याने पोलिसांनी कारवाई (Police Action) करण्याचे आदेश दिले.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur City Police Station) फिर्याद दाखल केली असून पालिसांनी ज्ञान प्रकाश मिश्रा (रा.उत्तर प्रदेश), नासीर (पूर्ण नाव माहित नाही) (राहणार औरंगाबाद) या दोघांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान सुरवडे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या