Monday, September 28, 2026
Homeक्राईमCrime News : बनावट सुगंधीत तंबाखू कारखान्यावर छापा

Crime News : बनावट सुगंधीत तंबाखू कारखान्यावर छापा

एलसीबीची कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

स्थानिक गुन्हे शाखेने एमआयडीसी हद्दीतील गजराजनगर येथे सुरू असलेला बनावट सुगंधीत तंबाखू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 13 लाख 92 हजार 190 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथक शहर व एमआयडीसी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना माहितीदारामार्फत गजराजनगर परिसरात एका घरामध्ये सुगंधीत तंबाखू तयार करण्याचा अवैध कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांना सोबत घेऊन पथकाने तत्काळ छापा टाकला. कारवाईदरम्यान तीन जण प्रत्यक्ष तंबाखू तयार करताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांची नावे असिफ खुदाबक्ष तांबोळी (वय 50, रा. मुकुंदनगर), जफर चाँद शेख (वय 38, रा. मुकुंदनगर) आणि दाऊद बाबुमियाँ शेख (वय 42, रा. भिंगार) अशी असल्याचे समोर आले.

या छाप्यात 600 किलो सुगंधीत तंबाखू, तंबाखू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे तीन मिक्सर, पॅकिंगसाठी तीन मशिन्स, 15 किलो रंग, चुना, पॅराफिनसारखी रसायने, एअर कंप्रेसर, वजनकाटा, 90 हजार रुपयांचा बनावट किवाम, सहा इलेक्ट्रिक मोटारी, बनावट स्टिकर्स, पिशव्यांचे रोल तसेच एमएच 17 व्ही 700 क्रमांकाची टाटा सफारी गाडी असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांसह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...