Sunday, March 30, 2025
Homeमनोरंजनप्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशीचे नव्या क्षेत्रात पाऊल

प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशीचे नव्या क्षेत्रात पाऊल

मुंबई | Mumbai

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशीने अभिनयानंतर आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याने याबाबत स्वत: माहिती दिली आहे. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे.

- Advertisement -

जितेंद्र जोशीने आपल्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर पोस्ट शेअर करत म्हंटले आहे की, “2 डिसेंबर 1997 रोजी काही स्वप्नं घेऊन मी मुंबई मध्ये दाखल झालो. गेल्या 23 वर्षात मला या शहराने आणि इथल्या माणसांनी भरभरून प्रेम दिलं . शहाणं केलं. आज एक पाऊल पुढे टाकत मी माझ्या मित्रांसोबत आमचा पहिला चित्रपट निर्माण करायचं धाडस करतोय. तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी असू देत.”

जितेंद्र जोशीने आतापर्यंत अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. जितेंद्र जोशीने आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. दमदार अभिनेता अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. गोदावरी चित्रपटात जितेंद्र जोशीसोबत नीना कुलकर्णी, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे, सखी गोखले व संजय मोने मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन करणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : साईंच्या पादुका बाहेर नेण्यास काही ग्रामस्थांचा विरोध तर काहींचा...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi येथील साईबाबांच्या मुळ चर्म पादुका साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने 10 एप्रिलपासून दक्षिण भारतात नेण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा दिवसात पादुका दोन...